संगमनेर तालुक्यात तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे तरुणाचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रविंद्र वदक हे आपल्याजवळील मालवाहतूक करणारी गाडी घेऊन निमगावजाळी लोहारा रस्त्यावर सोनार देवाचा परीसरात बाबासाहेब भिकाजी आरगडे यांच्या शेतात कांदे भरण्यासाठी गेले असता उताराला गाडी मागे येऊ लागल्याने दुध डेअरीला घालून वडिलांच्या मदतीसाठी आलेल्या पंडित नेहरू विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत असलेल्या गोकुळ रविंद्र वदक (वय १६ वर्षे) याने मागे येणाऱ्या गाडीला उटी लावून गाडी अंगावर येईल या भीतीने बाजूला पळाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

अंधार असल्याने सुमारे पस्तीस फुट पाणी असलेल्या कठाडे नसलेल्या विहिरीत पडला. या घटनेची माहिती पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांना व परीसरातील तरुणांना समजताच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विहिरीतील पाणी उपसल्यानंतर मृतदेह आढळून आला. गोकुळ हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.