कंटेनर चालकाला मारहाण करून लुटले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकी वाहून नेणारे कंटेनरचालक राजेंद्र पन्नालाल पाल (वय ४२, रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश), मदतनीस कमल द्रोणसिंह पाल (वय १९) या दोघांना मारहाण करून लुटण्याची घटना शिर्डी येथील विश्रामगृहाजवळ घडली. यात चालकाला गंभीर मार लागलेला आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कंटेनरचालक राजेंद्र पाल व मदतनीस द्रोणसिंह पाल हे दोघे लघुशंकेसाठी शिर्डी येथील विश्रामगृहाजवळ गाडी थांबवून उतरले होते. त्याचवेळी हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला यात चालकाच्या हाताला व पायाला मोठ्या जखमी झाल्या. चोरट्यांनी १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व रोख १३ हजार रुपये लुटून नेले. चालकावर साईबाबा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

तक्रारीसाठी तो पोलीस ठाण्यात आला असता त्याने रडतच ही घटना पत्रकारांना सांगितली. यात तो चांगलाच घाबरलेला होता. यावेळ काहींनी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर कमल पाल यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर जरकीन घातलेले २० ते २५ वयोगटातील होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.