मुद्रा योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये तीनशे कोटींचे कर्जवाटप : सुवेंद्र गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्र सरकारच्या वतीने बेरोजगार तरुणांना व्यावसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मुद्रा योजनेद्वारे जिल्ह्यामध्ये तीनशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, यामुळे हज़ारो बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे गटनेते आणि नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी (शिराळ) येथे खा. दिलीप गांधी यांच्या निधीतून सुमारे पंधरा लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हरेश्वर देवस्थानचे प्रमुख भगवान महाराज मचे होते.

गांधी पुढे म्हणाले, केंद्र सरकारने गोरगरीब जनतेसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणल्या असून, बेरोजगार तरुणांसाठी मुद्रा योजना, गरिबांसाठी उज्वला गॅस योजना, जनधन योजना राबवून स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त देश घडवण्याचे काम पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले आहे.

असे सांगत गांधी म्हणाले, राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या चिचोंडी गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत लवकरच प्रत्येक बाजार समितीत उपबाजार समितीमध्ये उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जलयुक्तमुळे अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, चिचोंडी येथील मिलखेवस्तीचा बांधारा व रस्त्याचा प्रश्न निश्चित मार्गी लावू, 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
या कार्यक्रमास नगरसेवक महेश तवले, युवानेते प्रसाद बोरा,भाजप युवा मोर्चाचे रोशन गांधी, विशाल सुरपुरिया, पं.स. सदस्या सौ. गंगुबाई आटकर, मिरी तिसगाव नळयोजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर , भाजपचे युवानेते वैभव खलाटे , सरपंच संतोष शिंदे , सुरेश चव्हाण ,महादेव गीते , दिलीप गीते, शंकरराव कराळे , कैलास गीते, जिजाबा लोंढे, पोपटराव कराळे , रामदास गोरे , डॉ. रामेश्वर गीते, डॉ. गोरख गीते, काका पालवे , पद्माकर आव्हाड , घनशाम जराड , विष्णू गंडाळ , बबनराव गायकवाड , पोपटराव आव्हाड , बब्बूभाई शेख , प्रमोद जराड , ज्ञानेश्वर जराड , कमलेश गुगळे , शिवाजी दानवे , सुनिल गरुड, दिपक दानवे, अनिस शेख, दिगंबर जऱ्हाड , पोपटबाबा आव्हाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.