पैसे उकळणाऱ्या तलाठ्याचा गांधीगिरी स्टाईल आंदोलनाने निषेध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या संवत्सर येथील तलाठी हे शेतकऱ्यांकडून सात बारा, आठ अ आदी उताऱ्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराव्यतिरिक्त जादा पैसे उकळून त्यांना वेठीस धरत असल्याबद्दल समस्त शेतकरी बांधवांनी संतप्त भावनांना आवार घालून गांधीगिरी आंदोलन करत त्यांचा तलाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पुष्पहार घालून सत्कार करून अनोख्या पद्धतीने निषेध केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा झाली. त्यात संजीवनी कारखान्यांचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे, महेश परजणे यांनी सात बारा उताऱ्यासाठी गावचे तलाठी जादा पैसे घेतात अशी तक्रार केली. त्यावर गरमागरम चर्चा होवून अखेर या उताऱ्यासाठी ३० रुपये आकारणी करण्यात यावी, असा ठराव संमत झाला. पण त्या ठरावाला संवत्सर गावचे तलाठी यांनी केराची टोपली दाखविली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळणे सुरूच ठेवले म्हणून शेवटी संतप्त शेतकरी संजीवनीचे माजी संचालक राजेंद्र भाकरे यांच्या हस्ते गांधीगिरी आंदोलन करत संवत्सर तलाठ्यांचा सत्कार करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी संजीवनीचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे, राजेंद्र भाकरे, अनुप शिंदे, कृष्णा वालझाडे, अभिजित आबक, प्रविण भोसले, यादव दैने, राजेंद्र परजणे, विवेक बोरनारे, अंबादास सोनवणे, प्रतापराव परजणे, अमृत संजीवनीचे संचालक विजय काळे, चिमाजीराव दैने, अशोकराव लोहकणे, योगेश परजणे, दत्तात्रय परजणे, सुरेश लोखंडे, पंचअवतार शेतकरी गटाचे सदस्य तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.