भ्रष्टाचाराचे पुरावे जेथे पोहोच व्हायला पाहिजे होते तेथे पोहोच झाले - गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नेवासा दौऱ्यावर आले असता ते आम्हाला भेटू नये यासाठी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी भरपूर प्रयत्न केले, पण तरीही तालुक्यातील रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे जेथे पोहोच व्हायला पाहिजे होते तेथे पोहोच झाले आहेत, अशी माहिती माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सोनई येथे पत्रकारांशी बोलताना गडाख म्हणाले, केंद्रीय परिवहनमंत्री गडकरी अत्यंत स्वच्छ व शिस्तप्रिय मंत्री आहेत. ते नेवासा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता नेवाशात रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार त्यांच्या निदर्शनास आणण्याचा आमचा प्रयत्न होता. 

गेल्या तीन वर्षात लोकप्रतिनिधींनी नातेवाईक ठेकेदाराच्या मार्फत जे रस्ते केले, ते एका पावसात उघडे पडले. रस्ता दुरुस्तीसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कागदोपत्री दाखवून बिले काढली. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह लेखी तक्रारी केल्या आहेत. 

पदाचा गैरवापर करीत चुकीचे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना धाक दाखविला जात आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे दूध उत्पादक, विद्यार्थी, ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. पाहुणे ठेकेदार सांभाळण्याच्या नादात सामान्य जनता लोकप्रतिनिधींकडून वेठीस धरली जात आहे.याचा सर्वाधिक फटका भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बसला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
याबाबतची नाराजी अनेकदा भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे बोलून दाखविली आहे, याचे आमदार मुरकुटे यांनी आत्मपरीक्षण करावे. ना. गडकरी यांना आम्ही भेटू नये यासाठी लोकप्रतिनिधी सलग दोन दिवस मुंबईत झटत होते, एवढा जोर त्यांनी तालुक्यातील पाटपाणी, शेतीचे प्रश्न, अवैध धंदे बंद करण्यासाठी लावला असता तर तीन वर्षे जनतेचे हाल झाले नसते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.