नदीपात्रात आत्महत्या केलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रवरा नदीपात्रात आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी शोधण्यात बेलापूर पोलीस व ग्रामस्थांना यश आले आहे. मृतदेह मिळाल्यानंतर महसूल, पोलीस व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नोकरीस असलेले बाळू चंद्रकांत मंडलीक (वय ४१) यांनी सोमवारी सांयकाळी साडेपाच वाजता प्रवरा नदीवरील पुलावरुन नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
तिसऱ्या दिवशीही शोध न लागल्यामुळे सरपंच भरत साळुंके व पत्रकार देविदास देसाई यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात येथे तातडीची बैठक घेऊन गुरुवारी दिवसभर मृतदेह शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तहसीलदार सुभाष दळवी यांचेशी संपर्क करण्यात आला. 

त्यांनी देखील सर्व सहकार्य करण्याचे सांगितले. तहसीलदार सुभाष दळवी, मंडलाधिकारी अशोक बनकर सकाळी आठ वाजताच नदीवर आले. तहसीलदार दळवी यांनी विविध ठिकाणी संपर्क साधून पोहणारांना बोलविले. श्रीरामपूर तहसीलदार कार्यालयातून पोहण्याचे जँकेट व ट्यूब मागविण्यात आल्या. अंबादास लोंढे व दत्तात्रय परदेशी यांनी जँकेट घालून नदीच्या कडेकडेने शोध घेतला असता खंडोबा मंदिराच्या कडेला असणाऱ्या घाटाच्या कडेला नदीपात्रात मृतदेह आढळून आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
बेलापूर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बाळू मंडलिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक होते. संघाच्या प्रत्येक संचलनात ते अग्रेसर असायचे. त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई असा परिवार आहे. बेलापूर येथील स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेलापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लोटके हे करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.