सावेडीतील दत्त देवस्थानमध्ये २ कोटींचा अपहार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावेडीतील प्रेमदान चौकातील दत्त देवस्थान मंदिराच्या ट्रस्टमध्ये २ कोटी १० लाख ६४ हजार रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रस्टच्या सचिव, विश्वस्तांसह १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवस्थानचे विश्वस्त रमेश जगन्नाथ जाधव (वय ६३, रा. नवपाडा, ठाणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे की, श्री दत्त देवस्थान ट्रस्टमध्ये २०११ सालापासून सचिव संजय शिवाजी क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत काही विश्वस्त व इतर व्यक्तींना हाताशी धरत बनावट कागदपत्रे, खोटे कोटेशन व न झालेल्या कामांची बिले काढून देवस्थानच्या २ कोटी १० लाख ६४ हजार रूपयांचा अपहार केल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी सचिव क्षीरसागर यांच्यासह विनोद पुरषोत्तम नामजोशी, नितीन श्रीनिवास जोगळेकर, राजन वसंत जोशी (सर्व रा. पुणे), सुधीर भालचंद्र माळी, मोहन पद्मनाथ शुक्ल (दोघे रा. जळगाव), केदार कुलकर्णी, आनंद गोसावी, अनंत घळसासी, विकास लब्बा, चंद्रशेखर कुलकर्णी, दिपक इनामदार, नरेंद्र गोहाड (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
या अपहारामध्ये प्रामुख्याने देवस्थान आवारातील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्याचे बांधकाम करताना मनपाच्या परवानगीनुसार न बांधता ९ लाख ६८ हजारांची अफरातफर केली तसेच पहिल्या मजल्यावरील मंजूर नकाशाव्यतिरिक्त १९९.४५ स्क्वेअर मीटर अधिकचे बांधकाम दाखवून ४२ लाख ९४ हजार रुपयांचा अपहार केला, एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या नावाने ५२ लाख रुपयांचे बनावट बील तयार करून देवस्थानची फसवणूक केली, तसेच आणखी एका फर्मच्या माध्यमातून २१ लाखांचे बील देवस्थान ट्रस्टच्या रकमेतून काढून फसवणूक केली, यासह विविध फर्मच्या माध्यमातून देवस्थानच्या रकमेचा अपहार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. पांडुरंग पवार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.