चौकशीनंतरच काय ते सत्य समोर येईल - सीताराम गायकर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीची सध्या चौकशी सुरू झाली आहे. ज्या तक्रारी सहकार खात्याकडे आल्या त्यानुसार ही चौकशी होत असून, या चौकशीनंतरच काय ते सत्य समोर येईल अर्थात बॅंकेने भरतीसाठी नाबार्डने दिलेल्या सूचनेनुसार प्रक्रियेसाठी नायबर या संस्थेची निवड केली होती. त्यामुळे या भरतीची सर्व जबाबदारी त्या संस्थेची आहे. यात पदाधिकारी किंवा संचालक यांच्या हातात काहीच नाही. कोटीचे आकडे हे केवळ बोलले जात आहे. त्यामुळे चौकशीतून आरोपांची तथ्यता समोर येईल, असे बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
बॅंकेच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर गायकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. वैभव पिचड, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, किशोर भिंगारे उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर संचालक आ. शिवाजी कर्डिले आणि अण्णासाहेब म्हस्के निघून गेले. गायकर म्हणाले की, बॅंकेच्या नोकरभरतीला सहकार खात्याने स्थगिती दिली आहे. त्याबाबतची माहिती संचालक मंडळाच्या बैठकीत दिली. यावेळी संचालकांनी होत असलेल्या आरोपांबाबत खंडण केल्याचे ते म्हणाले.

नाबार्डने ठरवून दिलेल्या चार संस्थांपैकी दोन संस्थांनी काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यापैकी पुण्याच्या नायबर संस्थेला नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले. परीक्षा संस्थेमार्फत झाली. पेपर या संस्थेने काढले. 90 गुण या संस्थेकडे होते. केवळ 5 गुण हे मुलाखत घेणाऱ्यांच्या हातात होते. परीक्षा झाल्यानंतर पात्र असणाऱ्या उमदेवारांची नावे बॅंकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. बॅंकेच्या निवड समितीत परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना 5 गुण शैक्षणिक अर्हतेला आणि 5 गुण समितीच्या पातळीवर देण्याचे अधिकार होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या समितीत सात सदस्य असून यातील पाच सदस्य हे शासकीय सदस्य असून अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे दोन अशासकीय सदस्य होते. यामुळे भरती प्रक्रिया राबविताना बॅंक प्रशासन, पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या हातात काही नव्हते.

बॅंकेचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मुलांची नावे पात्र यादीत आले आहेत याबाबत संचालक मंडळाला कोणतीच कल्पना नव्हती. ही नावे परीक्षा उत्तीर्ण होऊन यादीत आलेली आहेत. सहकार खात्यामार्फत सुरू असणाऱ्या चौकशीत हा प्रकार चुकीचा असल्याचे सिध्द झाल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येईल, असे गायकर यांनी स्पष्ट केले.

या भरतीसंदर्भात बॅंकेच्या संचालक मंडळाचे काहीही म्हणणे नाही.बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध नाबार्डने ठरवून दिलेला आहे. त्यांच्या परवानगीने भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामुळे भरतीबाबत शंका उपस्थित करणे गैर असल्याचे गायकर म्हणाले. बॅंकेच्या भरतीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी तक्रार केल्यानंतर त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे गायकर म्हणाले.

बॅंकेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला होता. ही वस्तुस्थिती अनेक वृत्तपत्रांतून मांडण्यात आली होती. नाबार्डने आकृतिबंध निश्‍चित करून जागा जाहीर केल्या. त्यांच्या निकषानुसार भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु, आता या प्रक्रियेत होत असलेल्या देण्या-घेण्याच्या आरोपांबाबत सर्वच संचालक अनभिज्ञ आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.