शेवगावातील गुटखा विकणाऱ्या 8 टपऱ्यांवर छापा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गुप्तवार्ता शाखा, मुंबई, अन्न व औषध भेसळ प्रशासन विभाग, नगर व नाशिक यांच्या संयुक्‍त पथकाने शहरात एकाच वेळी आठ टपऱ्यांवर छापा टाकून गोवा, हिरा, बाबा या गुटख्याच्या पुड्या, आदी प्रतिबंधित साडेसतरा किलो मावा असा पाच हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मात्र, या कारवाईतून मावा विक्री करणारे बडे धेंड सुटल्याने अन्न व औषध प्रशासन आणि सदर विक्रेते यांच्यात “मिलीभगत’ झाली होती का ? या शंकेला वाव मिळत आहे. शहरात शेकडो टपऱ्यांमधून सर्रासपणे खुले आम मावा विक्री होत असताना हा कारवाईचा फार्स करून या विभागाने नेमके काय साधले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या पथकाने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक व बसस्थानक चौकात एकाच वेळी अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाच्या 12 जणांच्या पथकाने आठ टपऱ्यांवर छापे टाकले. या पथकाला पाहताच एकच गोंधळ उडाला व भ्रमणध्वनीद्वारे अन्य विक्रेत्यांना याची माहिती मिळताच बाकीची सर्व दुकाने बंद करून टाकली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या कारवाईत किरकोळ विक्रेते सापडले. मात्र, या कारवाईतून मोठी उलाढाल असणारे विक्रेते सुटल्याने याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. शेवगाव माव्याचे मोठे केंद्र असून, येथे मावा निर्मितीचे कारखानेही आहेत. यापैकी कोणावरही कारवाई न करता टपऱ्यांवर रोजीरोटीसाठी रोजंदारीवर मावा घासणाऱ्यांवर ही कारवाई झाली. मालक मात्र या कारवाईतून सुटले असून, या विभागाने डोंगर पोखरून उंदीर काढल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

शेवगाव येथील मावा प्रकरण सुमारे तीन महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी उचलून धरले. त्यानंतर सुमारे दीड महिन्यांपूर्वी थातूरमातूर कारवाई करण्यात आली. त्यासंबंधीचा खटलाही अद्यापि दाखल झालेला नाही. आजही ज्या आठ टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्या आठ टपऱ्यांना सील करण्यात आले आहे. 

तेथे सापडलेला मुद्देमाल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यावर संबंधितांवर अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत 2006 नुसार खटले दाखल करण्यात येणार असल्याचे बी. एम. ठाकूर यांनी सांगितले. कारवाई झाल्यानंतर त्या दिवसापुरत्या टपऱ्या बंद राहतात. त्यानंतर माव्याची विक्री सर्रासपणे सुरू होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने या कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यासंबंधी मुंबईचे सहायक आयुक्‍त डी. के. सावंत यांनी सांगितले की, शेवगावात प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यावरून या पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखा दुर्धर असाध्य रोग होतो म्हणून जनहितार्थ अन्न व औषध भेसळ प्रशासन, नगर सहायक आयुक्‍त बी. एम. ठाकूर आणि परीविक्षाधीन उपअधीक्षक पौर्णिमा तावरे यांच्या सहकार्याने आंबेडकर चौकात आठ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आला.

या पथकात नगरचे सहायक आयुक्‍त बी. एम. ठाकूर, तपासी अंमलदार आर. डी. पवार, अन्नसुरक्षा अधिकारी, दक्षता मुंबईचे नीलेश विसे, राहुल टाकटे, बी. बी. भोसले (नगर), पी. एस. पाटील (नाशिक), गुलाब वसावे (नाशिक) आदींचा समावेश होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.