लोणी-मावळा बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही नराधमांना फाशी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली.
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

लोणी मावळा येथे २२ ऑगस्ट २०१४ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाची घटना घडली. या घटनेच्या आधी संतोष लोणकर याने सदर मुलीची छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २२ ऑगस्टला संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग केला.

पीडित मुलीवर तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिच्या नाका-तोंडात चिखल घातला. संतोष लोणकर याने मुलीच्या डोक्यावर स्कू्रड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकर याने तिच्या डोक्यात दगड घातला, तर दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता. आरोपींनी अतिशय विकृत पद्धतीने हे कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता..

मुलीवर बलात्कार आणि खून खटल्यात सोमवारी (ता.6) जिल्हा न्यायालयात तिन्ही आरोपींना दोर्षी सिद्ध केले होते. सरकारी पक्षाने आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.