मुलीला पळविल्या प्रकरणी व्यापाऱ्याला अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका वीस वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी येथील चप्पल दुकानदार रवींद्र शेंडे यास गणपती पुळे येथे अटक करण्यात आली आहे. काल नेवासे न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मुलीने श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. नेवासे येथील बसस्थानक परिसरात रवींद्र शेंडे याचे चपलेचे दुकान आहे. याठिकाणी नेहमी चप्पल खरेदीसाठी जात असतो. माझ्या मुलीने शेंडे याने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचे सांगितले. तसेच तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मी नेहमीप्रमाणे नेवासे न्यायालयात कामकाजाकरीता गेलो असता पत्नी व मुलगी घरीच होते. मी रात्री नऊ वाजता घरी आलो आणि झोपलो. दि. २ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मी लघुशंकेसाठी उठलो असता माझी मुलगी दिसली नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने मी शेंडे यांच्याकडे गेलो. तोही जागेवर नव्हता. तिचा शोध घेतला असता शेंडे हा स्विफ्ट कार (क्र. एमएच १७ एझेड ११६९) या गाडीतून गेला असल्याचे समजल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी नेवासे पोलिसांनी शेंडे याला शोध गणपती पुळे येथे सापळा लावून पकडले. त्याला नेवासे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी शेंडे याने लोकसभा निवडणुकी दरम्यान अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. शेंडे याचे लग्न झालेले असून त्याला पत्नी, दोन मुले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.