शहरात होणारे विकासकामे गडाख यांना खुपत आहेत - आ. बाळासाहेब मुरकुटे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्या मुख्याधिकाऱ्यांनी देवळाली प्रवरा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला, त्या मुख्याधिकाऱ्यांना आम्हा शहराचा कायापालट व्हावा यासाठी नगरपंचायतला आणण्याचा प्रयत्न केले. त्यातून शहराचा विकास होईल त्याच मुख्याधिकाऱ्याला माजी लोकप्रतिनिधी काळे फासण्याचा इशारा देत आहे. ही बाब विकासकामाला बाधा आणणारी असल्याचे आ. बाळासाहेब मुरकुटे म्हणाले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आ. मुरकुटे म्हणाले, विरोधक स्वत:च्या काळातील भष्टाचार झाकण्यासाठी कांगावा करीत आहेत. आतापर्यंत सर्व कामे त्यांच्याकाळात या ठेकेदाराला मिळाली आहे. त्यावेळेस त्यांनी ठेकेदारास वेगवेगळ्या मागण्या केल्या त्याची सर्वांना माहिती आहे.

आमच्या ताब्यात नगरपंचायत असताना ठेकेदाराला काम दिले नाही. शहरात होणारे मोठ मोठी विकास कामे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. शहराला एवढे वर्षे खेड्याचे स्वरूप गडाखांनी आणले आहे, ते आता बदलत असल्याने त्या नैराश्यातून ते आमच्यावर टिका करत आहेत.

ग्रामपंचायत काळात ही पाणी योजना दुरूस्ती कामाकरीता ठेकदाराची नेमणूक देखील गडाखांच्या आधिपत्याखालील तत्कालीन ग्रामपंचायतीने केली होती. काम त्या कार्यकाळात पूर्ण होऊन त्याचे हस्तांतर देखील त्यांच्याच काळात झाले त्याचे सुमारे १ कोटी ६७ लाखाचे बील त्यांच्याच काळात काढल्याची नोंद ग्रामपंचायतीत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

शहरातील विकासकामाचा मोठा निधी पाहता व कामात येत असलेला पारदर्शीपणा पाहून त्यांना हे सहन होत नसल्याचे यावेळी आ.मुरकुटे म्हणाले. पाणी योजनासह विविध बिनबुडाचे आरोप करून ते लोकांना दिशाभूल करीत आहे. संबंधीत पाणी योजना दुरूस्ती कामाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल लवकरच समोर येईल आणि अहवालाच्या पाहणीप्रमाणे कार्यवाही होईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.