जिल्ह्यातील २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा पोलिस दलातील २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. १२ पोलिस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ६ पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील एकूण २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून, यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलिस निरीक्षक व ६ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

यामध्ये बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोनि. ललित पांडुळे यांची श्रीरामपूर विभाग जिल्हा वाहतूक शाखेत, संगमनेर पोलिस ठाण्याचे पोनि.गोविंद ओमासे यांची शेवगाव पोलिस ठाण्यात, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोनि.सुरेश शिंदे यांची जिल्हा विशेष शाखेत, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि. पांडुरंग पवार यांची नियंत्रण कक्षात, अहमदनगर जिल्हा वाहतूक शाखेचे पोनि. राजेंद्र पडवळ यांची बेलवंडी पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षाचे पोनि. प्रसाद गोकुळे यांची संगमनेर विभाग वाहतूक शाखेत.

दहशतवाद विरोधी पथकाचे पोनि. दिलीप पारेकर यांची संगमनेर पोलिस ठाण्यात, संगमनेर पोलिस ठाण्याचे पोनि. गोकुळ औताडे यांची संगमनेर शहर पोलिस ठाण्यात, शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. सुरेश सपकाळे यांची तोफखाना पोलिस ठाण्यात, जिल्हा विशेष शाखेचे पोनि. अविनाश मोरे यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात, जामखेड पोलिस ठाण्याचे पोनि. सुनील पाटील यांची नगर शहर वाहतूक शाखेत, नियंत्रण कक्षातील पोनि. संभाजी पाटील यांची शिर्डी येथे साई मंदिर सुरक्षा विभागात, संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे सपोनि. गोपाळ उंबरकर यांची संगमनेर वाहतूक शाखेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

नगर वाहतूक शाखेचे सपोनि. नितीन पगार यांची जामखेड पोलिस ठाण्यात, कर्जत पोलिस ठाण्याचे सपोनि. मनोहर इडेकर यांची पाथर्डी पोलिस ठाण्यात, शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागाचे सपोनि. सचिन जाधव यांची शिर्डी पोलिस ठाण्यात, वाचक कार्यालयाचे सपोनि. विकास थोरात यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील पोसई. विश्वनाथ निमसे यांची वाचक कार्यालयात.

नेवासा पोलिस ठाण्याचे पोसई. गणेश जांभळे यांची श्रीगोंदा पोलिस ठाण्यात, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोसई. अमोल गंगलवाल यांची राहाता पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील पोसई. सुनील सूर्यवंशी यांची नेवासा पोलिस ठाण्यात, श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे पोसई. प्रदीप शेवाळे यांची श्रीरामपूर वाहतूक शाखेत तर राहाता पोलिस ठाण्याच्या पोसई अर्चना करपुडे यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.