दोन लाखांच्या मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लग्नानंतरच्या तीन महिन्यांपासून दुचाकी, घरातील फर्निचर व सजावटीचे सामान आणण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेवून ये, म्हणून दमदाटी, शिवीगाळ, मारहाण व उपाशी पोटी ठेवून कष्टाची कामे करून आपल्या मुलीस नवरा, सासरा, व सासू यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची तक्रार अनिता गोरख निरगुडे हिने कोपरगाव ग्रामीण पोलिसांत दिली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मयत विवाहिता प्रियंका प्रमोद सिनगर (वय २३, मु.पो.भोजडे, ता.कोपरगाव) ही दि. ३ नोव्हेंबर सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली होती. 

मात्र, तीन दिवसांनंतर बेपत्ता विवाहिता प्रियंका हिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याची माहिती विहिर मालकाने कोपरगाव ग्रामीण पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व विहिरीतून मृतदेह बाहेर काढून सदर खबरीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

मयत प्रियंका हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर रात्री ११.३० वाजता अनिता गोरख निरगुडे (रा. संवत्सर, पढेगाव पोलीस चौकी) यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसांत नवरा प्रमोद, सासरा बाळासाहेब व सासू हिरार्बाइ सिनगर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

फिर्यादीत १ जानेवारी २०१७ रोजीचे तीन महिन्यानंतर ३ नोंव्हेंबर रोजी चार वाजेपर्यंत मयताचे सासरी दुचाकी व घरातील फर्निचर व सजावटीचे सामान आणण्यासाठी माहेराहुन दोन लाख रूपये घेवून ये, म्हणून दमदाटी, शिवीगाळ, मारहाण व उपाशीपोटी ठेवून कष्टाची कामे करून आपल्या मुलीस नवरा, सासरा व सासू यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे म्हटले आहे. 

सदर फिर्यादीवरून पोलिसांनी नवरा, सासरा व सासू यांच्या विरोधात फर्स्ट १३४/ २०१७ भादंवी कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरनर करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.