नगरच्या भुईकोट किल्यात पंडित नेहरुंचे जागतिक दर्जाचे संग्राहलय व्हावे - सत्यजीत तांबे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा असून पंडित जवाहरलाल नेहरु यांचे येथे अनेक दिवस वास्तव्य राहिले आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या जगप्रसिध्द ग्रंथाचे लेखन ही येथेच केले असल्याने भुईकोट किल्यात त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्राहलय करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी खा.शरदचंद्रजी पवार यांचेकडे केली आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुंबई येथे राष्ट्रीय नेते व मुंबई नेहरु सेंटरचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची भेट घेवून सत्यजित तांबे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली.यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले कि अहमदनगर शहर हे मध्य महाराष्ट्राचे मोठे ऐतिहासिक परंपरा असलेले शहर आहे.शिवकाल व भारतीय स्वतंत्र्यलढ्यात ही या शहराचे मोठे योगदान राहिले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना स्वातंत्र्यलढ्यात अटक केल्यानंतर ब्रिटीशांनी अनेक दिवस या किल्यात ठेवले होते.नेहरुजींचे मोठे वास्तव्य येथे राहिले आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची साक्ष देणारा जगप्रसिध्द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ देखील त्यांनी येथेच लिहिला आहे. खा. शरद पवार हे मुंबईच्या नेहरु सेंटरचे अध्यक्ष असून त्यांनी नेहरु सेंटरच्या माध्यमातून नेहरुंच्या जिवनावरील डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आकर्षक संग्राहलय उभारले आहे. 

त्यामुळे मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक वरळी येथील संग्राहलयाला भेट देतो. त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यात पर्यटन व्यवस्था वाढविण्यासाठी भुईकोट किल्ल्यातील या खोलीमध्ये नेहरुंसह 14 स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी हे संग्रहालय उभे करावे म्हणजे नगरच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.