पाथर्डीचे जावईबापू होणार विधान परिषदेचे आमदार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार कै. बाबूराव भापसे यांचे धाकटे जावई आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने पाथर्डी तालुक्यातील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबतची माहिती अशी की, निंबोडी सारख्या छोटया गावाने एक नव्हे, दोन दोन आमदार देत महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत पाथर्डी तालुक्याचा एक राजकीय ठसा राज्यामध्ये उमठवला आहे. शिक्षणमहर्षी आ. कै. रावसाहेब म्हस्के आणि आ. कै. बाबूराव भापसे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये फरक एवढाच आ. म्हस्के शांत -संयमी होते. ते विधानसभेत गेले. तर आ. भापसे आक्रमक आणि निर्भीड होते. ते विधान परिषदेत गेले. 

तालुक्यातील दोन सुपुत्र आमदार होते. याला या घटनेला खूप दिवस उलटले असले तरी आता नव्याने या गावाला जावयाच्या रुपाने पुन्हा एक आमदार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.आ. कै. बाबूराव भापसे यांना कल्पना, सीमा आणि निता या तीन मुली तर हेमंत आणि प्रमोद ही दोन मुले. 

कै बाबूराव भापसे मुंबई येथेच वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांची धाकटी कन्या निता यांचा विवाह मुंबईचे रहिवासी आणि आता भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी करत असलेले म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्याशी झालेला आहे. 

प्रसाद लाड हे बाबूराव भापसे यांनी सुरू केलेल्या हुतात्मा बाबू गेणू शिक्षण संस्थेचे अध्यक्षही आहेत. या संस्थेच्या पाथर्डी तालुक्यामध्ये जवळपास वीसहून अधिक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे लाड यांना भाजपने विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही पत्ता ऐनवेळेस कट केला आहे. 

राणे यांना भाजपने डावलल्याने शिवसेनादेखील भाजपचे लाड यांच्यासोबत राहणार हे निश्चित. त्यामुळे लाड यांच्या माध्यमातून पाथर्डीच्या जावयाला आमदार होण्याची संधी मिळते का ? याची उत्सुकता सध्या पाथर्डीकरांना लागली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.