राऊत मृत्यू प्रकरणी नोर्को टेस्टची भानुदास कोतकरांची न्यायालयाकडे मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दत्तात्रय शंकर राऊत मृत्यू प्रकरणी फिर्यादी शंकर राऊत व त्यांची पत्नी पार्वतीबाई राऊत यांच्यासह माझीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी अशोक लांडे खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भानुदास कोतकर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------

न्यायालयाला दिलेल्या अर्जात म्हंटलेे आहे की, दि.30-6-2001 रोजी शंकर राऊत यांनी आपला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि.1-7-2001 रोजी राऊत यांनी पुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची तक्रार दिली होती. 

शंकर राऊत यांनी सदरची केस हेतू पुरस्सरपणे खुनाच्या गुन्हयाकडे वळवली आहे. सदर गुन्हयाचा तपास सीआयडीकडे वळविण्यात आला आहे. वास्तविक राऊत आणि माझा काहीही संबंध नसून सूड जागवण्यासाठी मला यात गोवण्यात आले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN

------------------------------------

त्यामुळे फिर्यादी शंकर राऊत व त्यांची पत्नी पार्वतीबाई राऊत यांची नार्को टेस्ट कायद्याच्या हितासाठी घेणे आवश्यक आहे. त्यांच्याबरोबर माझीही नार्को टेस्ट न्यायालयासमोर अविा निवृत्त न्यायाधिश किंवा आयपीएस अधिकार्‍यासमोर घेण्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी कोतकर यांनी न्यायालयाकडे केली आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.