विखे पाटलांच्या शिर्डीत विकास वेडा झालाय !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात 'विकास वेडा' झाल्याची टीका केली आहे, याबाबत त्यांनी एक संदेश शेअर केला असून सोशल मिडीयावर हा संदेश व्हायरल झाला आहे.


नेत्याच्या गावातच कायदा व सुव्यवस्थेची वाट लागली.

पोलीस व प्रशासनावर नेत्यांचा धाक राहिला नसल्याने प्रवरा परिसरात चोऱ्या, रस्ता लूट, दरोडे ,महिलांच्या अंगावरील सोन्याची दागिने हिसकवणे या घटना सर्रास वाढल्या आहेत. अलीकडेच लोणी खुर्द गावात राजू बोरा या व्यवसायिकाच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी बोरा यांच्या वृद्ध मातोश्री चा खून केला. दोन आठवडे झाले तरी अद्याप आरोपी पकडले नाहीत. नेत्याच्या गावातच कायदा व सुव्यवस्थेची अशी वाट लागली आहे. ते मतदार संघातील इतर गावाचे काय संरक्षण करणार ?

चांगल्या कारखान्याचे मुलाच्या राजकीय हट्टा पायी वाटोळे.


ऊस उत्पादकांना एफ आर पी प्रमाणे ऊसदर नाही. राजकारणा साठी गणेश व राहुरी साखर कारखाने चालवायला घेतले. प्रवरेचा बॉयलर गणेश ला देऊन 10 दिवस प्रवरा कारखाना बंद ठेवला. त्यामुळे कारखान्याचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे प्रवरा परिसराची कामधेनू ' विखे पाटील ' साखर कारखानाला 73 कोटी चा तोटा झाला . हा कारखाना कर्जबाजारी केला. एका चांगल्या कारखान्याचे मुलाच्या राजकीय हट्टा पायी वाटोळे केले.त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान केले.

◆प्रवरेत विकास पागल झाला 

प्रवरा परिसरात व शिर्डी मतदार संघात इतका प्रचंड विकास झाला की गावातून जाणारा प्रत्येक रास्ता ,कोल्हार-कोपरगाव हायवे, शिर्डीबाह्य वळण रस्ता, लोणी- पिंपरी रस्ता, कोल्हार- लोणी- संगमनेर रास्ता, लोणी- बाभळेश्वर रस्ता, राहता- गणेशनगर- वाकडी रस्ता, कोल्हार- पाथरे रस्ता, लोणी-पाथरे रस्ता, लोणी- दाढ , निमगाव जाळी - आश्वि रस्ता, लोणी- आडगाव, लोणी- गोगलगाव, प्रवरा दूध डेअरी ते साखर कारखाना- पुढे बेंद मार्गे पाथरे रस्ता, कोल्हार- राजुरी,कोल्हार- फत्याबाद रस्ता, साकुरी रोड, शिर्डी- पिंपळवाडी रोड, अस्तंगाव- पिंपरी रोड, बाभलेश्वर- राजुरी- ममदापूर, बाभलेश्वर- तिसगाव वाडी, तिसगाव वाडी- कोल्हार, आश्वि- निमगाव जाळी, कोकणगाव- रहिमपूर, आश्वि खुर्द- शिबलापूर हे रस्ते इतके गुळगुळीत आहेत की यावरून मोटार सायकल, कार इतकेच काय पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. प्रत्येक रस्त्याची चाळण झाली आहे .रोज अपघात होत आहेत.

◆ कामगारांवर अत्याचार ? 

शेजारी यु टेक शुगरने काटा पेमेंट 3100 दर देऊ केल्याने या भागातील काटा मारणाऱ्या नेत्यांची मोठी पंचायत झाली. कारखाना परीसरात ऊस वाढी साठी प्रवरा परिसरातील शिक्षण संस्था,साखर कारखाना ,मेडिकल ट्रस्ट या संस्थेतील कर्मचाऱ्यांवर ऊस लागवडी साठी सक्ती करण्यात आली आहे. तुम्ही ऊस लागवडी करा,जमीन नसेल तर शेतकऱ्यांना भेटून त्यांना ऊस लागवडी साठी तयार करा. हे काम तुम्हाला सक्ती ने करावेच लागेल . जो कर्मचारी सहकार्य करणार नाही अशांना नोकरीवरून काढून टाकू अशी धमकी दिली असल्याचे समजते. प्रवरा परिसरातील कामगारांवर सुरू झालेल्या या अत्याचाराचा मी निषेध करतो असेही या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी सांगितले आहे.

◆प्रचंड विकास केला असल्याने मतदार जागा झाला

नेत्याने या परिसरात इतका प्रचंड विकास केला असल्याने निवडणुकीत त्यांना खूपच यश मिळाले आहे. राहता पालिका, साकुरी ,राजुरी या ग्रामपंचायती मध्ये नेत्याची सत्ता गेलीच. आश्वि जिल्हा परिषद गटातही झालेल्या 11 ग्राम पंचायत पैकी 9 ग्रामपंचायती मध्ये सपाटून पराभव का झाला ? असा सवाल अशोक विखे पाटील यांनी केला असून  भूलथापांना बळी न पडता तो मतदार जागा झाला आहे . त्यामुळेच सत्ताधाऱ्यांचा पराभव होऊ शकला आहे .नेत्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधींच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रवरा व शिर्डी मतदारसंघात 'विकास पागल झाला आहे ' कारण या भागातील ढोंगी व भ्रष्टचारी नेत्यांनी परिसराचा विकास नव्हे , वाटोळेच केले आहे .असे सांगितले आहे.

◆ शेतकरी संघटनेच्या उपोषणाला पाठिंबा

येत्या 4 डिसेंबर रोजी ३५०० रुपये ऊस दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे लोक लोणी येथे विखे पाटील पुतळ्या समोर उपोषणास बसणार आहेत. याला माझा पाठिंबा आहे. प्रवरा कारखान्याने एफ आर पी प्रमाणे दर दिला नाही. मागील गळीत हंगामातील ३०० रुपये प्रति टन दिले नाहीत आणि चालू हंगामाची पहिली उचल किती देणार हे अद्याप जाहीर केले नाही. 

विरोधी पक्षनेत्यांने स्वतः च्या ताब्यातील कारखान्यातर्फे सभासदांना कमी भाव दिला आहे . ते राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय न्याय मिळवून देणार आहेत ? ऊस दरासाठी प्रवरा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला पाहिजे. 

पद्मश्री विखे पाटील व लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचाराशी बांधील राहून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दर मिळालाच पाहिजे. यासाठी मी या लढ्यात शेतकऱ्यांच्या बाजूने उतरलो आहे.४ डिसेंबर रोजीच्या लोणी येथील उपोषण आंदोलनात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे ही विनंती.

' शेतकऱ्यांना लुटू नका, तुमच्या पापाचा घडा, सत्तेची मस्ती एक दिवस हाच शेतकरी बांधव उतरवल्या शिवाय राहणार नाही. शेतकरी एक जुटीचा विजय असो आणि तो होणारच याचा मला विश्वास आहे. 

- डॉ अशोक बाळासाहेब विखे पाटील.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.