बायकोशी पटत नसल्याने वृद्ध आईला मुलाने जिवंतपणी ठेवले स्मशानात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बायकोशी पटत नाही म्हणून वृद्ध आईला मुलाने जिवंतपणी स्मशानात ठेवल्याची घटना घडली आहे. स्मशानात राहणाऱ्या या ‘माऊलीच्या निवाऱ्याची व्यवस्था ‘माऊली’ नावाच्या सामाजिक संस्थेने केली आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये लक्ष्मीबाई दिवस कंठत होत्या. ज्या मुलाला आयुष्यभर हाताच्या फोडाप्रमाणं जपले, त्याच मुलाने या माऊलीला जिवंतपणी स्मशान दाखवले. मात्र, तरीही या मातेचे काळीज मुलासाठी तळमळते आहे. 

‘मुलगा वाईट नाही. पण सुनेशी पटत नाही, त्याचा नाईलाज होतो, म्हणून त्याने इथे ठेवले आहे.’ असे म्हणत ही माऊली आपल्या मुलाला पाठिशी घालते. मुलगा रोज डबाही आणून देतो. असे सांगत आता फक्त घरी कधी नेतो, याचीच ही माऊली वाट पाहत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
नालेगाव परिसरातच लक्ष्मीबाई आहुजा राहायच्या. कधीकाळी त्या खूप श्रीमंत होत्या, सावकारकी करायच्या. मात्र, सूनेशी पटत नसल्याने दत्तक घेतलेल्या मुलाने त्यांना सहा-सात महिन्यांपूर्वी नालेगावातील अमरधाम स्मशानभूमीत आणून सोडले होते, असे परिसरातील लोकांकडून सांगितले जाते. 

सोशल मीडियावर लक्ष्मीबाईंची व्यथा मांडणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे यांनी त्यांना आसरा दिला आहे. सोशल मिडियावर या वृद्धेची ससेहोलपट व्हायरल झाल्यानंतर संवेदनशील व्यक्तींनी डॉ. धामणेंशी संपर्क साधून या वृद्धेला घेऊन जाण्याची विनंती केल्याने त्यांनी मनोरुग्ण महिलांसाठी असलेल्या आपल्या इंद्रधनु प्रकल्पात तिला नेले असून, तिचा सांभाळ करण्याचेही ठरवले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.