'राजीवजी राजळे' कुछ कर दिखानेका सोचा था उसने !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजीव राजळे दिलखुलास आणि खुमासदार व्यक्तिमत्व. स्वभावाने मि. परफेक्शनिस्ट असलेल्या राजाभाऊंचा सामान्यतल्या सामान्य कार्यकर्त्यांबरोबरचा संबध मात्र अत्यंत आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा होता. शिवारातल्या शेतकऱ्यालाही भाऊंशी सुख-दु:खाच्या गप्पा मारायला अडचण येत नव्हती आणि सोशल मिडीयाशी कायम कनेक्ट असलेल्या तरूणाला लाईक केल्याशिवाय राहवत नव्हतं. विकासाची तळमळ, गुड गव्हर्नन्सचा आग्रह, शेती, रोजगार, उद्योग आदींच्या विकासासाठीचे शाश्वत चिंतन राजीव राजळेंच्या व्यक्तीमत्वात सापडत होते.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राजीवजी आणि राजकारणाची आवड?
मुळात त्यांच्या बालपणाचे राजकारणापेक्षा समाजकारणच अधिक होते. राजकारण हा त्या समाजकारणाचा एक भाग होता. त्यांच्या घरी दररोज वैचारिक उहापोह व्हायचा. दिल्लीपासुन गल्लीतल्या राजकारणापर्यंत चर्चा व्हायच्या. कै. दादापाटील राजळे आणि कै. भाऊसाहेब थोरात दोन दिग्गजांचा वैचारिक आणि सामाजिक वारसा त्यांना लाभल्याने भले-बुरे जाणण्याची विवेकबुध्दी त्यांना फार लवकर अवगत झाली. या सर्व वातावरणात शिक्षणाप्रतीची बांधिलकी त्यांनी तसूभरही ढळू दिली नाही . प्रवरा पब्लिक स्कुलमध्ये सुरूवातीचे शिक्षण घेतल्यावर पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये वास्तुविशारद म्हणुन पदवी संपादन केली आणि दरम्यानच्या काळात प्रॅक्टीसही केली.

राजकारणातील प्रवास
त्यांनी आर्किटेक्चर चे शिक्षण घेऊन तारुण्यात राजकारणात प्रवेश केला व तारुणवायातच त्यांना यश व अपयशाची चव त्यांना चाखावी लागली...नगर लोकसभा क्षेत्रातुन २००९साली अपक्ष निवडणूक लढवून ३लाखावर मते घेणारे,तर २०१४ साली लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढली, पण केवळ मोदीलाटेमुळे हातातोंडाशी अलेला विजय हिरावुन घेतला.अाज त्यांच्या पत्नी शेवगाव-पाथर्डीचे विधानसभेत प्रतिनीधित्व करत अाहेत.

विधानसभेतील अभ्यासू आणि संस्मरणीय कारकीर्द
आमदार म्हणुन जबाबदारी मिळाल्यावर राजीवजींनी प्राधान्य क्रमाने विकास ही भुमिका स्वीकारली. योगायोगाने बाळासाहेब थोरात मंत्री झाले. त्यामुळे त्यांच्या लोकविकासाच्या भुमिकेला आणखी पाठबळ मिळाले अनेक विकासाच्या योजना त्यांनी तालुक्यात अत्यंत जोकसपणे राबविलल्या. कृषी खात्याची नालाबंद, रोजगार हमी योजना, जलसंधारण, डांबरीकरण आणि जोडरस्ते आदी योजनामध्ये आघाडी घेतली.भारत निर्माण शिवकालीन पाणी पुरवठा योजना आणि जलसुराज्याच्या माध्यमातून आणि गावागावांमध्ये विकासाची गंगा पोहोचली.

दरम्यानच्या काळात स्थानिक राजकारणही त्यांच्या हाती आले. त्यामुळे लोकांचे वैयक्तिक प्रश्न सोडविता आले. पाईपलाईनच्या कर्जापासुन अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले. संजय गांधी निराधार योजनेत त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या काळात फार चांगले काम केले. नामंजुर झालेल्या फाईल्स का नामंजूर झाल्या त्याची कारणे शोधून या फाईलींची पुर्तता केली.विधीमंडळातही त्यांनी मनापासुन काम केले. बेरोजगारी, अर्थ, नागरीकरण बांधकाम आदी विषयांवरील स्वतंत्र मते त्या-त्या चर्चेच्या वेळी अत्यंत स्पष्टपणे मांडली. विरोधी आमदारांनीही त्यांच्या मतांचे कौतुक केले होते.एकनाथ खडसेंनी तर फार छान भाषण केलेस अशी लेखी दादही त्यांना दिली होती.

कुछ कर दिखानेका सोचा था उसने
राजीवजी भविष्यातील कामांविषयी म्हणत की आपल्या आजुबाजूचे पुणे, औरंगाबाद , नाशिक जस विकसीत होऊ शकते तर नगर का नाही ? मिरी, मांडवगण, (श्रीगोंदा) , पारनेर या पठार भागात एस. ए. झेङ (स्पेशल ऍ़डीट झोन) अर्थात आवर्षण ग्रस्त पट्टा तयार करून तेथे नव्या उद्योगांना पायाभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रेल्वे आणि प्रभावी दळवणवळणाचे जाळे यात निर्माण करावे लागेल. हे होऊ शकते आणि यासाठी फक्त इच्छाशक्तीची गरज आहे दुसरे काही नाही. नागरी प्रश्नासंदर्भातही आता आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. वाढत्या नागरीकरणात हाऊसिंग सिक्युरिटी आज महत्वाची झाली आहे. या अनुषंगाने अर्बन प्लॅनिंग होणे आवश्यक आहे.

असा हा एक सुशिक्षित व दुरदृष्टी असलेला नेता आज आपल्यातून निघून गेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


पोस्ट / लेखक / साभार - इन नगर | आवाज अहमदनगरचा

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.