राजाभाऊ आमची चूक झाली, तुमचे नेतृत्व आम्हाला हवे होते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कै. राजीव राजळे यांना दोनदा खासदार म्हणून नाकारणे हि नगरकरांची चूकच, आज राजाभाऊ आपल्यात नाहीत,सोशल मीडिया वर आता अनेक लोकांच्या प्रतिक्रिया वाचतोय कि राजीव राजळे खासदार म्हणून हवे होते,खरेच एवढा अभ्यासू ,हुशार, अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेला, सामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यांची कामे प्रशासकीय यंत्रणेकडून कशी करून घ्यावीत याची उत्तम जण असलेले नेतृत्व आपण नगरकारांनी केवळ भावनेच्या आणि लाटेच्या आहारी जाऊन दोनदा नाकारले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरात भव्य प्रमाणात भरवलेले पुस्तक प्रदर्शन, काव्य संमेलन यामुळे या नेत्याबद्दल आदर आणखीन वाढला, कुठलीही राजकीय ताकद पक्ष स्वरूपात मागे नसताना लोकसभेची पहिली निवडणूक राजाभाऊंनी अपक्ष म्हणून लढवली आणि दोन लाखावर मते घेतली

यावरुन त्यांच्या निर्भीडपणाची आणि लोकप्रियतेची साक्ष पटते, पण दुसऱ्या वेळी लाटेने घात केला आणि भावनेच्या भरात नगरकरांनी तिसऱ्यांदा चूक केली आणि त्याच निष्क्रिय व्यक्तीला तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवले,आणि विद्यमान खासदारांनी आजपर्यंत कामाच्या बाबतीत काय दिवे लावले ते आपण बघतोच आहोत,
राजाभाऊ खरेच आमची चूक झाली, तुमचे नेतृत्व आम्हाला हवे होते.

पोस्ट / लेखक / साभार - Pradyumna Sonawane Patil

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.