....तीच असेल राजाभाऊंना ख-या अर्थाने श्रद्धांजली...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  काल रात्री राजाभाऊ आपल्याला पोरकं करून गेले. त्यानिमित्ताने अहमदनगर शहर व जिल्ह्याची वैचारिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या अपरिमीत हानी झाली आहे. कोणत्याही पराभवाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतुनही नवनिर्माणाची आस ठेवणारा हा एक लढवय्या तरुण होता. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगरकरांना त्यांचे हे मोठेपण मान्य होते. परंतु, तरिही असल्या अभ्यासू, तडफदार व कर्तबगार नेत्याला त्यांनी 'नारळ' दिल्याचे आताही आश्चर्य वाटतेय. मात्र, समाजाने नाकारल्यानंतरही समाजाप्रती तोच आदर, निष्ठा व प्रेमभावनेने ते काम करीत होते. असा स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी झटणारा हा नेता होता.

राजाभाऊंची एक आठवण सांगाविशी वाटतेय. दहाएक वर्षांपूर्वीची असेल. आपल्याकडं फेसबुक त्यावेळी नवीनचं होतं. त्यावेळीही मी व्यक्त होताना लोकशाही-समाजवादी विचार स्पष्ट मांडायचो. तत्कालीन सरकारच्या चुकांवर व्यक्त व्हायचो. नुकताच मुंबई-पुणे सोडून नगरात आलो होतो. 

अल्प भूधारक शेतक-याचा मी मुलगा असल्याने राजकारणी मला हेलो करतील, अशी शक्यताच नव्हती. पण एक दिवस फेसबुकला पर्सनल मेसेज दिसला. "तुझं अन् माझं प्रोफाईल सेमचं आहे की..." मी पाहिलं कोण आहे बुवा हा अपरिचित मित्र. तर ते होते राजीव राजळे . 

वाटलं माजी आमदार व राजकीय नेते राजळे नसतील हे. कोणीतरी फसवत असेल. पण त्यांचे प्रोफाईल मीही तपासले. त्यात पुण्यातील एमएमसीसी कॉलेजसह राजकीय विचारही खरचं सेम होते. पण मी कानाडोळाच केला. नंतर पुन्हा तोच मेसेज बॉक्समध्ये दिसला अन् मग राजाभाऊंशी संवाद सुरू झाला. 

नगरच्या इतर राजकारण्यांना न भेटता फटकून राहणारा मी, राजाभाऊंशी सतत संपर्कात होतो. पण लोकसभा निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागला अन् या संपर्कात खंड पडला. अनेकदा वाटायचं, जाऊयात भाऊंशी गप्पा करायला.

पण ते सगळं राहुनचं गेलं. भाऊ माझ्यासारख्या लाखो तरुणांना पोरके करुन गेलेत. काल रात्रीच काही मित्रांना फोन केला. तेही बोलण्याऐवजी माझ्यासारखेच रडले. भाऊ होतेच आमच्यासारख्यांचे मार्गदर्शक मित्र. त्यांचे विचार पुढे नेऊन नगर दक्षिणेचा विकास करण्यासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. तीच असेल राजाभाऊंना ख-या अर्थाने श्रद्धांजली...

(लेखक : श्री. सचिन मोहन चोभे)

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.