'क्वालिफाईड' खासदाराला नगर दक्षिणने नाकारले याची हुरहूर कायम !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी आमदार राजीव राजळे यांचे काल रात्री दुखःद निधन झाले, त्यांच्या निधनानंतर शेवगाव - पाथर्डी मतदारसंघातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नेटीझन्स आज फेसबुक आणि  ट्विटरसह सोशल मिडीयावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आहेत .सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्ट अहमदनगर लाईव्ह च्या वाचकांसाठी.    ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राजकारणातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व ,बांधावर उभं राहूनही अख्ख्या जगाची खबरबात ह्या माणसाला असायची. अगदी बेडरूममध्येही गेलं की अख्खी बेडरूम पुस्तकांनी भरलेली, जगभरातील कोणत्याही लेखकाचं नाव सांगा, राजाभाऊ पुढचं सांगायला सुरुवात करायचे, आपण गपगुमान ऐकायचं. हॉलिवुड मुव्हीचंही असंच. जगभरातील अप्रतिम चित्रपट राजाभाऊनं पाहिलेले असायचे.

साहित्य, संस्कृती, कला, संगीत, विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, कृषी आणि राजकारण अशा कितीतरी विषयांना राजाभाऊ सहज स्पर्श करायचे, बोलताना त्यातली खोली स्पष्टपणे जाणवायची. निवांत कितीही वेळ गप्पा मारत बसाव्यात, असा सहृद. अधून-मधून भेट व्हायची. गावगप्पा व्हायचा, अगदी उखळ्या-पाखळ्याही निघायच्या. मित्र बनून हा माणूस समृद्ध करत जायचा, जगणं शिकवत राहायचा.

अलीकडच्या काळात मात्र कमी झालेलं हे. पण मनात कायम हुरहूर होती, एवढं सर्वांगीण उत्तुंग व्यक्तिमत्त्व आमच्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मतदारांनी नाकारलं आणि त्यांना 'नारळ' दिला. पण एक 'क्वालिफाईड' खासदार नाकारला, याची जाणीव मतदारांना नक्की होईल.

भावपूर्ण श्रध्दांजली..
पोस्ट / लेखक / साभार - सोशल मिडिया 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.