आमचा नेता आम्हांला पोरका करुन गेला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राजीव राजळे यांचा जन्म ५ डिसेंबर, १९६९ साली पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगांव येथील राजळे घराण्यात श्री. आप्पासाहेब व सौ. मोहिनीबाई राजळे यांच्या पोटी झाला. त्यांनी आपले सुरूवातीचे शिक्षण प्रवरा पब्लिक स्कुल, लोणी येथे घेतले तर वास्तुविद्याविशारद (बॅचलर ऑफ अर्किटेक्ट) पदवी पुणे विद्यापीठातुन घेतली.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

आजोबा स्व. दादापाटील राजळे (भाऊ) व स्व. भाऊसाहेब थोरात (दादा) यांच्या संस्काराचा वारसा लाभलेले हे व्यक्तीमत्व "राजाभाऊ" या नावाने प्रसिध्द होते. खरेदी विक्री संघाचे संचालक ते आमदार असा राजकीय प्रवास करतांना अनेक खाचखळगे त्यांच्या वाट्याला आले.

पुढे काय असा प्रश्नही अनेकदा त्यांच्या कट्टर समर्थकांना पडला मात्र वाहणारे पाणी जसे मार्ग शोधत पुढेच जाते तसा प्रवास आजही राजाभाऊंचा चालु होता. हा प्रवास ते करतात ते फक्त त्यांचेकडे असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर.

उच्चशिक्षित राजळे यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली होती. तसेच उत्तम वक्ता म्हणून त्यांची विधानसभेत ओळख होती. राजळे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे वर्तमान संचालक होते. त्यांच्या पत्नी मोनिका राजळे भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. माजी आमदार आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.

राजळे यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूकीत लढविली. राजळे यांच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहेत. राजळे यांच्यावर पाथर्डीत पिंपळगाव कासारला आज दुपारी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

भाऊ तुम्हाला भावपुर्ण श्रध्दाजंली
एक निष्ठावंत कार्यकर्ता.

पोस्ट / लेखक / साभार - सोशल मिडिया 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.