सत्यजीत फक्त 'सत्य' परिस्थितीवरच बोलतो !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जगताप समर्थक विरुद्ध तांबे समर्थक अशी लढाई सध्या सोशल मीडियावर नगरच्या नेटीझन्सचे मनोरंजन करीत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या कामकाजाबाबत सत्यजीत तांबे यांच्या उपरोधिक फेसबुक पोस्टला आमदार जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न त्या 'कमोड' वरुन नाही तर रस्त्यावर उतरून सुटतात ! अश्या आक्रमक भाषेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले मात्र आता या टीकेला सत्यजित तांबे समर्थकांनी 'अभ्यासूपणे' उत्तर दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

नगर शहर खरेच बदलले का हा प्रश्न विचारतच,सत्यजीत फक्त सत्य परिस्थितीवरच बोलतो, सत्यजीतदादा नगरच्या सर्व राजकारण्यांबाबत बोलले, कोणाचेही नाव न घेत जे खरे मुद्दे आहेत तेच मांडले अशा आशयाची पोस्ट समर्थक शेअर करत आहेत. 

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली पोस्ट पुढीलप्रमाणे - 

मित्रांनो काल 19 ऑक्टोबर तारीख झाली, तारीख सर्वांनाच माहीत असेल, 19 ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.! महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होती की युती होईल का ? आघाडी होईल का ? आणि युती ही झाली नाही आणि आघाडी ही झाली नाही, परिणामी सर्व पक्षांनीं आपापले वेगवेगळे उमेदवार दिले, मतांमध्ये विभागणी झाली आणि 25 वर्षांचा इतिहास बदलला, हार-जित ही राजकारनाची सख्खे भावंड आहेत ह्या गोष्टी प्रत्येक राजकारनीं व्यक्तीला माहीत असतात.! 

आपण सर्व उमेदवार व त्यांची कार्य शैली ओळखत होतो, पण ह्यात एक वेगळा उमेदवार , त्याची वेगळी ओळख, त्याची कार्य करण्याची वेगळी पद्धत, विकासात्मक दूरदृष्टी असलेला नेता, त्यांनी अफिडेबिट करून दिल होत की एवढी काम करणार, पण तरीही काही मतांवरून त्यांना हार पत्करावा लागला, तरीही त्यांनी त्यांच्या कामाची लय ही चालूच ठेवले, आणि आज ही आपण पाहतोय त्यांच्या कामाबद्दल तळमळ , त्यात मित्रांनो काही काम अशी होती की जी नगर च्या एकही उमेदवारांनी आज पर्यंत त्यावर कधी विचार सुद्धा केला नाही आणि त्यात 10 काम अशी होती की ती जर नाही केली तर कायद्याने जी शिक्षा लागेल ती भोगण्यास पात्र असेल, 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
मित्रांनो त्यासाठी कार्यक्षम पणा हा महत्वाचा असतो, आणि असे उमेदवार होते ते काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक नेते सत्यजीत तांबे पाटील, यांनी कायमच नगरच्या प्रश्नांवर आवाज उठवला, सध्या तर नगरच्या उड्डाणपुलाविषयी ते सरकार च्या हाथ धुवून माघ लागलेत आणि एवढंच नाही तर त्यांनी असा निश्चय केलाय की जो पर्यंत उड्डाणपूल होणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही.! 

काल 3 वर्ष पूर्ण झाले, मी काल त्यांच्या फेसबुक अकाउन्ट वरून 1 पोस्ट पहिली, पण त्यात त्यांनी सत्य परिस्थिती नगर बद्दल मांडली ! मित्रांनो आपणही पाहू त्यांनी काय मांडलं .!

खरंच समाधान आहे , ३ वर्षात नगर शहर संपूर्ण बदलून गेलंय. पिण्याच्या पाण्याची २४ तास सोय झालीय, रस्ते चकचकीत झालेत, सर्वत्र लहान मुलांसाठी छान गार्डनस् व विद्यार्थ्यांसाठी वाचनालय झालीत, उड्डाणपूल पूर्ण झालाय, बायपास मुळे शहरातल्या रस्त्यांना ताण कमी पडतोय, पुणे-नगर रेल्वे चे कामही अंतीम टप्प्यात आलयं, एमआयडीसीत आलेल्या नविन मोठ्या उद्योगांमुळे हजारो युवकांना नोकरी मिळालीय, कुणालाही नगर सोडून पुण्या- मुंबईला जावसं वाटत नाहीय. आता नगर शहर रिटायर लोकांचे व पेन्शरांचे शहर म्हणून नव्हे तर युवकांचे वेगाने प्रगत होणारे शहर म्हणून ओळखले जातंय यापेक्षा काय अधिक पाहीजे ! 

मी जेव्हा ही पोस्ट पहिली, त्या नंतर त्यांना फोन केला, त्यांनी माझा फोन उचलला, व त्यांनी व मी तब्बल 15 ते 20 मिनिट या नगर शहरावर चर्चा केली, त्यातून एक मला जाणवलं की त्यांचा मध्ये नगर शहराबद्दल खूप तळमळ आहे, त्यांना नगर शहराची छबी बदलायची आहे, ते मला म्हणाले, की ह्या नगर शहराला आता पर्यंत खेड म्हणुन ओळखले जाते, उड्डाणपूल नाही, बाह्यवळण रास्ता नाही, विकासाच्या नावावर उगाच काहीतरी चालायल, नगर जैसे थे तसच आहे, आणि एवढंच नाही तर नुसत नारळ फोडून नाही विकास होत हे ही ते म्हणाले, 

पण ह्यात त्यांनी कोणाचेही नाव नाही घेतले, तरी मी सकाळपासून पाहतोय काही पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या नावाने खडे फोडायचा प्रयत्न करतायेत ! पण मला त्यांना ही सल्ला द्यायचा आहे त्यांनी तर कोणाचेही नाव ही घेतले नाही, माझ्या मते ते नगर च्या संपूर्ण नेतृत्वावर बोलले, मग त्यात व्यक्तिगत कोणाचेही नाव नाही घेतले ! आणि हो त्यांनी मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हे, सत्यजीत फक्त सत्य परिस्थितीवरच बोलतो अस मला वाटते, हे माझं व्यक्तिगत मत आहे ! आणि माझ्या मते त्यांनी काल मांडलेल्या सर्वच्या सर्व मुद्दे बरोबर आहेत, माझा आपल्या सर्व युवा मित्रांना व तरुण मित्रांना व ज्येष्ठ मंडळीला एक विचारायचं आहे , की खरच नगर थोडं तरी बदललं का हो ? 

मोदींच्या लाटेत खासदार झेलेले उड्डाणपुलावरन नगर ची दिशाभूल करतायेत, पालकमंत्री सुद्धा त्या बाबतीत श्रेय घेण्यात पुढे, मग नगर बद्दल कोणी काही बोललं तर त्याच्या नावानी खडे फोडायचे, मग ही गोष्ट तुम्हाला तरी पटते का ? आज माझं वय 32 आहे मी घेल्या 15 वर्षांपासून नगरचे राजकरण जवळून पाहतो, नगर शहराला फक्त भूल भुल्ह्या करून ठेवलंय, आता कोणी केलय आणि कस केलंय हे तुम्ही विचार करा , पण नगर बद्दल चांगले विचार ठेवा, मग कोणीही असो, जो नगर चा चांगला विचार करेल जनता त्याच्या सोबत असेल, मग कोणताही पक्ष असो .!  - एक नगरकर

(सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट अहमदनगर सोशल मिडीया ह्या पेजच्या माध्यमातून अहमदनगर लाईव्ह २४.कॉम वर पब्लिश केल्या जातात अहमदनगर लाईव्ह हे स्वतंत्र आणि निपक्ष न्यूज पोर्टल असून कोणत्याही राजकीय नेत्या आणि पक्षांच्या विचाराशी आम्ही बांधील नाही.)

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.