सत्यजीतदादा जनतेचे प्रश्न त्या 'कमोड' वरुन नाही तर रस्त्यावर उतरून सुटतात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ३ वर्षांत बदलत्या नगर शहरा बाबत आमदार संग्राम जगताप यांच्यावर केलेल्या सत्यजीत  तांबे यांच्या उपरोधिक फेसबुक पोस्टला आमदार जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

File Photo - Satyajeet Tambe And Sangram Jagtap
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ही पोस्ट -

अहो सत्यजीत दादा तांबे कमीतकमी पाडव्यानिम्मित तरी आम्हा नगरकरांच्या रोषाला नव्हते आज बळी पडायचे राव "काय म्हणालात? आमदारकीच्या ३ वर्षात संग्राम जगताप यांनी काय केले?"निवडणूक आल्या की तुमच्या सारख्या पावसाळ्यातील छत्र्या येतात आणि गायब होतात हे काय आम्हाला नवे नाही.एक नागरिक म्हणून आज शुभेच्छा देण्यापेक्षा हे उत्तर तुम्हाला देणे माझं कर्तव्य समजतो

आमदार निधी काय आणि कसा असतो हे दाखवलं या आमदार संग्राम जगताप यांनीच.शहराचे आमदार विधानभवनात शहराचे प्रश्न मांडत निधी आणू शकतात हे दाखवलं आम्हाला या संग्राम जगताप यांनीच.

मी काय म्हणतो,
गेल्या २५ वर्षांचे रखडलेले प्रश्न त्यांना नसतील सगळे १००% सोडवता आले पण उपनगरातील नागरिक म्हणून छातीठोकपणे सांगेल की, पिढ्यानपिढ्या उपेक्षित उपनगरे नियोजनबद्ध पद्धतीने नवीन रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, हायमॅक्स आणि अगदी लोकसहभागातून बोल्हेगावंमधील लोकांच्या दारात पाणी आणण्याचे काम संग्राम जगताप यांनी केल्याचे आम्ही साक्षीदार आहोत.

शहरातील विविध बुरसटलेले चौक सुशोभीकरण, अनेक रखडलेले कोठी सारखे मजबूत सिमेंट काँक्रीटचे लख्ख प्रकाशाने चमकणारे रस्ते, जेष्ठ नागरिकांचे प्रश्न, तृतीयपंथी लोकांची स्मशानभूमी असे बरेच काही काही....वेळ नाही पुरणार एवढे छोटे मोठे प्रश्न नक्कीच यांनी सोडवले.अंधारलेल्या, हताश झालेल्या नगरकरांच्या मनात विकासाचा दिवा लावणारे हे आमदार संग्राम जगताप अशी यांची ओळख तुमच्या सारख्या बाहेरून स्वार्थासाठी आलेल्या लोकांना नाही पटणार किंवा तुम्ही नाही पटवून घेणार.

उंटावरून शेळ्या हाकने म्हणजे काय हे तांबे तुमच्या सारखे लोक नक्कीच दाखवतात. एवढा नगरकरांचा पुळका आहे तर पालिकेच्या गलथान कारभारावर नाही बोलले आजवर. नाही एखादे जनआंदोलन उभे केले लोकांच्या प्रश्नांसाठी. अरे हो, कमोड टॉयलेट वर बसून ट्विटर वर जाब विचारणारे उचभ्रू लोक तुम्ही. पण जनतेचे प्रश्न त्या कमोड वरुन नाही तर रस्त्यावर उतरून सुटतात हे संग्राम जगताप यांनी !

शेतकरी कर्जमाफी आंदोलन, बाह्यवळण रस्ता आंदोलन, विजमंडळावरील आंदोलन, शेतीमाल भाववाढ, विध्यार्थी प्रश्न अश्या कित्येक मोठ-मोठ्या जनआंदोलनातून सिध्द केलंय.तांबे, तुमचे मामा मंत्री, आई नगराध्यक्ष असताना तुमच्या तालुक्यातील मूलभूतही प्रश्न नाही सुटले तुमच्याकडून. मग तिकडे डावल्यानंतर नगरकडे तुमची बळजबरीने ट्रान्सफर ऑर्डर आली याचे किस्से अजूनही ऐकतो आम्ही लोक.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या फायद्यासाठी केलेली उमेदवारी आहे बरका आमच्या लक्षात पण काँग्रेस ची फिक्स वोटबँक विनाप्रयत्न मिळाल्याने पुढच्या निवडणूकीचे डोहाळे लागले की काय
संग्राम जगताप यांनी सुरू केलेल्या विकासाच्या गाड्याला खीळ बसवण्याच्या तुमच्या बुद्धीची कीव येते. असो या दिवाळीच्या निमित्ताने देवाला एकच प्रार्थना, नगरची इडापीडा टळो.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.