जनतेचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर - आ. स्नेहलता कोल्हे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत करून बचतगटांतून आत्मविश्वास साधला आणि हा प्रवास आपल्याला लोकप्रतिनिधीपयंर्त घेऊन गेला. खुर्चीपेक्षा जनतेचे प्रश्न सोडवून त्यात समाधान शोधण्यावर आपला नेहमीच भर असतो. जनशक्तीच्या सहकार्याने कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यात परमेश्वराने आपल्याला ताकद द्यावी व महिलांचे आरोग्य सदृढ ठेवण्यात सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शहरातील दत्तनगर भागात नगरपालिकेचे गटनेते रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिवाजी खांडेकर व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मोफत महिला आरोग्य तपासणी व उपचार शिबीर, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे सत्येन मुंदडा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी वॉटर कुलर व फिल्टर लोकार्पण सोहळा व शेतकरी सहकारी संघ येथे महिला शेतकरी मेळावा व महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आ. कोल्हे बोलत होत्या. 

यावेळी महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण करून देण्यांसाठी संजीवनी शॉपीचे उदघाटन करण्यात आले.शहरातील टिळकनगर ते तहसील कार्यालयापयंर्त विधीज्ञ रविंद्र बोरावके, शहराध्यक्ष कैलास खैरे, महावीर दगडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुशांत खैरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात होते.

 माजी आमदार स्व. राजीव राजळे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उत्तर नगर जिल्हा सेनेचे उपाध्यक्ष कैलास जाधव, नगरपालिका सेना गटनेते योगेश बागुल, संजीवनीचे उपाध्यक्ष शिवाजी वक्ते, संचालक अरूण येवले, साहेबराव कदम, बाळासाहेब नरोडे, मनेश गाडे, सोपानराव पानगव्हाणे, राजेंद्र कोळपे, शिवाजीराव कदम, निवृत्ती बनकर, माजी सभापती सुनिल देवकर, नगरसेविका ताराबाई जपे, स्वप्नील निखाडे, वैभव गिरमे, जनार्दन कदम, बाळासाहेब आढाव, भारती वायखिंडे, सत्येन मुंदडा, मेहमुद सय्यद, दिपाली गिरमे, संजय पवार, मंगला आढाव, विद्या सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गोपि गायकवाड, फकिर महंमद, पहिलवान मौलाना असिफ हाफीज, रियाज शेख आदींनी आमदार कोल्हे यांचा सत्कार केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.