अजनूज शिवारात बिबट्यासदृश प्राणी नागरिकांत भीतीचे वातावरण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज शिवारातील गायकवाड वस्तीच्या परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून बिबट्यासदृश प्राण्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

मागील काही दिवसांत मानवी वस्त्यांवर जंगली प्राण्यांचा अन्न आणि पाण्याच्या शोधात शिरकाव झाल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून तालुक्यातील अजनूज शिवारातील गायकवाड वस्ती परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून येत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील काही दिवसांपूर्वी पाहणी करून बिबट्यासदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

दोन दिवसांपूर्वी गायकवाड वस्तीवरील रहिवासी अनिल गायकवाड यांनी असा प्राणी वस्तीवरील रस्ता ओलांडताना पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गायकवाडवस्ती परिसरात आढळून येत असलेल्या बिबट्यासदृश प्राण्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात यावा. आणि तो प्राणी लवकरात लवकर पकडावा, अशी मागणी अनिल गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.