बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी माझी - आ.मुरकुटे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम व प्रत्येकाच्या कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी माझी असून नेवासा एमआयडीसीमध्ये परदेशी कंपन्या येण्यासाठी व त्यांना प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंर्त्यांना साकडे घालणार असल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या वतीने रविवारी दि.८ ऑक्टोबर रोजी नेवासा फाटा येथे नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित युवकांच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सत्तावीस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. यात सुमारे दोन हजार युवकांनी मुलाखती दिल्या.

नेवासा फाटा येथील यश मंगल कार्यालयात आयोजित नोकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड हे होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. 

यावेळी आ. बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी हितावह निर्णय घेतले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुद्रा लोन,बेटी बचाव,बेटी पढाव, मागासवर्गीयांसाठी गॅस वितरण योजना राबविल्या आहेत. कर्जमाफीचा लाभ सर्वांना मिळणार असल्याने कोणीही हतबल होऊ नये. नेवासा तालुक्यात जास्तीत जास्त निधी देण्यासाठी मुख्यमंर्त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

नोकरी महोत्सवासारखा उपक्रम हा नेवासा तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून रिकाम्या हाताला काम व प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचा आपला प्रयत्न रहाणार असून जातपात व राजकारण विरहित हा महोत्सव आहे. 

खडकाफाटा येथील रामदेव बाबांचा प्रकल्प देखील तीन महिन्यात चालू होणार असल्याने नोकरीच्या संधी तेथेही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ज्यांनी जॉब कार्डद्वारे नोंदणी केली आहे. ते या परिवाराशी जोडले असून या सर्वांना नोकरी देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो असे त्यांनी सांगितले. जॉब कार्डद्वारे नोंदणी करणाऱ्यांच्या अर्जाचा पात्रतेनुसार नोकरीसाठी शंभर टक्के विचार केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. 

प्रा.भानुदास बेरड यांनी अध्यक्षीय मनोगतात आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या पुढाकाराने आयोजित नोकरी महोत्सव या उपक्रमाचे कौतुक केले. असा लोकहितासह प्रत्येक घटकाचा विचार करणारा आमदार मी पाहिला नाही,असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

यावेळी कंपनीच्या वतीने यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समितीचे सदस्य अजित मुरकुटे,भानस हिवऱ्याचे सरपंच देविदास साळुंके,दत्तात्रय बर्डे, नामदेव खंडागळे, जॉब फेअरचे श्रीराम सातपुते, रहाणे, गॅलेक्सी कंपनीचे पियुष कोटेजा,शेती तज्ञ एकनाथराव भगत, अंकुश काळे,सचिन पारखे, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे,डॉ.सचिन सांगळे,भारत डोकडे, निरंजन डहाळे,मनोज साखरे यांच्यासह युवकयुवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे सरचिटणीस अशोक टेकणे यांनी केले. 

पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांनी आभार मानले. माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन झाल्यामुळे नोकरी मेळाव्याचा शुभारंभ दीपप्रज्वलन न करता सत्कार टाळून त्यांना प्रथम श्रद्धांजली वाहून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.