शेतकऱ्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांना आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील, तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत करावा. हीच शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा आहे. हे झाले, तर मोठा इतिहास घडेल,'' असे प्रतिपादन कल्पना इनामदार यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बुधवारी (दि. ४) वाकडीतील हनुमान मंदिर येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात इनामदार बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''मी स्वत: संपूर्ण क्रांती संघटनेची मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी, मागण्या यासाठी या संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा उभा करीत आहे. संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही व संघटना पुढे राजकारणात प्रवेश करणार नाही.

शेतकरी मागण्यांसाठी आंदोलने करतात, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. यावेळी कोणतेही गटतट न पाळता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र या. निवडणुका आल्या, की आपले प्रश्न विसरून राजकारण्यांच्या मागे पळणे बंद करा. शेतीमालाला कवडीमोल किंमत दिली जाते. 

शेतीमालाला योग्य भाव भेटला, तर सरकारच्या कुठल्याच कर्जमाफीची गरज राहाणार नाही. येत्या २६ जानेवारीच्या ग्रामसभेत गटतट विसरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येऊन मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकावा. त्यापुढे सरकारला पुढील एक वर्षाची मुदत देण्यात येईल,'' असेही त्यांनी सांगितली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, प्रताप वहाडणे, शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, नामदेव धनवटे, बापूसाहेब कणसे, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी शंकरराव लहारे, बाळासाहेब शिरगिरे, गोरक्ष कोते, भाऊसाहेब येलम, भिमराज लहारे, त्रिंबक लहारे, जालिंदर लांडे, साहेबराव शेळके, जगन्नाथ भवार, गणीभाई तांबोळी, रावसाहेब शेळके, सावळेराम आहेर, पांडुरंग लहारे, बबलू लहारे, दत्तात्रय लहारे तसेच वाकडी, चितळी, गोंडेगाव, मातुलठाण, पुणतांबा, धनगरवाडी गावातील शेतकरी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.