अकोले महावितरण कार्यालयावर आ.वैभव पिचड यांचा कंदिल मोर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विजेच्या वाढलेल्या भारनियमनाच्या विरोधात व भाजप सरकारच्या निषेधार्थ अकोल्यात रविवारी रात्री आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली वीजवितरण कंपनीच्या अकोले येथील कार्यालयावर टेंभे व कंदिल मोर्चा काढण्यात आला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अकोल्यातील कार्यालयापासून कोल्हार- घोटी राज्य मार्गाने हातात टेंभे व कंदिल घेत आ. पिचड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापारी- शेतकरी- कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणा देत थेट वीजवितरण कंपनीच्या अकोले येथील कार्यालयावर मोर्चा नेला.

या मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे, माजी सरपंच संपत नाईकवाडी, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका सचिव यशवंत आभाळे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम नवले, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस राहुल देशमुख, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड सहभागी झाले होते. यावेळी वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाबरोबर कंदिलही भेट देण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.