कर्जतमध्ये अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील नागापूर येथे वीज पडून एका शेतकऱ्या मृत्यू झाला तसेच गायीचे दाने वासरे दगावली. शनिवारी सायं.6 वाजेच्या दरम्यान कर्जत तालुक्यातील नागापूर परिसरात विज़ांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पाऊस सुरू असताना येथील शेतकरी सचिन प्रेमराज निंबोरे (वय ३५) हे शेतातील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या गायीच्या वासरांचे दोर सोडत असता त्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच झाडाला बांधलेल्या दोन वासरेही दगवाली. 

शेतात वीज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने त्यांचे कुटुंबीय घाबरले होते.मयत सचिन निंबोरे हे आपल्या आई- वडिलांना एकुलते एक होते. त्याच्यापश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, दोन बहिणी आहेत.याप्रकरणी महसूलच्या आधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

निंबोरे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागापूर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील शेतातील ऊस, तूर, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.