सुजित झावरेंचा तोडगा मान्य नाही !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसमधील जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व उपसभापती दीपक पवार व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांच्यातील पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला असुन यांचे शिष्टमंडळ शनिवारी सकाळी पुण्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहे.तर दुसरीकडे तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्या हटाव मोहिमेचा नारा लागवला नाही तोच तालुकाध्यक्ष पठारे यांनी उपसभापती दिपक पठारे यांना गुरूवारी बडतर्फ नोटीस पाठविण्यात आली आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यानुसार उपसभापती दिपक पवार यांनी त्या नोटीसीचा खुलासा पण केला असुन उपसभापती पदासाठी युवानेत्याला पैसे मोजले असल्याचे त्यात नमुद करण्यात आले आहे. पवार यांच्या भैटीला पारनेर तालुक्यातील शिष्टमंडळ गेले असुन यामध्ये उपसभापती दिपक पवार अशोक सावंत, राळेगणचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, इद्रभान गाडेकर यांचा समावेश आहे. 

तर सुजित झावरे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्याबरोबर अथवा कार्यालयात यासबंधीची कोणत्याही प्रकारची बैठक नको. बंडखोरांनी तालुका नेतृत्वावर घणाघाती टीकास्त्र सोडत सुजित झावरे यांना वगळून राष्ट्रवादी कोअर कमिटीची स्थापना करण्याचा निर्णय गुरूवारी घेण्यात आला होता. 

यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपदही लवकरात लवकर बदण्यात यावे, अशी एकमुखी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचे पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकरराव उचाळे, औद्योगिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी केली होती. 

मात्र,निघोजच्या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी उपसभापती दिपक पवार व अशोक सावंत यांना वगळून मधूकर उचाळे यांनी सुजित झावरे यांची नगरला भेट घेतली. यात दोघांनीही झावरे-पवार वाद मिटल्याचा निर्वाळा दिला. मात्र दिपक पवार व अशोक सावंत यांना ही भूमिका मान्य नाही. 

 जो निर्णय होईल तो आता अजितदादा यांच्या दरबारातच असा पवित्रा सावंत व पवार या जोडगोळीने घेतल्याने राष्ट्रवादीतील अविश्वासाचे ढग आणखी गडद बनत चालले आहे.

कृषी समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या अध्यक्षस्थानी निघोजमधील भैरवनाथ पतसंस्थेच्या सभागृहात काल झालेल्या बैठकीला अशोक सावंत, दीपक पवार, सोमनाथ वरखडे, उमेश सोनवणे, बाळासाहेब इकडे, इंद्रभान गाडेकर, विक्रम कळमकर,अरुण घनवट, अप्पासाहेब कळमकर, भाऊसाहेब लटंबळे, विजय खंदारे, नानासाहेब वरखडे, भाऊसाहेब लामखडे, बाळासाहेब लामखडे, दत्ता लाळगे, विजय वराळ, शिवाजी भुकन यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्यामुळे मिळाले असून माझ्या महामंडळ निवडीशी सुजित झावरे यांचा काडीमात्रही संबंध नाही. उलट याच सुजित झावरेंनी महामंडळ पदास विरोध केल्याने दोन वर्षे महामंडळ पद उशिरा मिळाले. 

पारनेरसह जिल्ह्याच्या राजकारणात सुजित झावरे हा माझ्या बोटाला धरून आला असून पहिल्या पंचायत समिती तिकीटास स्व. वसंतराव झावरे यांचा विरोध होता. तरीही माझ्या आग्रहाखातर स्वर्गवासी वसंतराव झावरेंनी सुजितला उमेदवारी दिली. 

परंतु आता स्वर्गवासी वसंतराव झावरे व स्व. गुलाबराव शेळके यांची राष्ट्रवादी तालुक्यात राहिली नसल्याची खंत तालुक्यातील कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचा आरोप अशोक सावंत यांनी बैठकीत केला होता. 

तसेच तालुक्यातील सर्वच महत्वाची पदे वडुले गावाला दिली असून तालुक्यातील बाकीची गावे काय नष्ट झाली की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाकी गावांमध्ये नाहीत, असाही सवाल कार्यकर्त्यांनी केला होता. 

यावेळी विक्रम कळमकर व उमेश सोनवणे यांनीही सुजित झावरे यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागत झावरेंनी पक्षाच्या नावाखाली चाललेली आपली दुकानदारी बंद करावी व पक्षाला काळिमा फासणारे कृत्य करू नयेत, अशी टीका अशोक सावंत यांनी केली होती. 

मधुकर उचाळे यांची शिष्टाई असफल?
पारनेर तालुका राष्ट्रवादीतील नाराजांकडून तालुका नेतृत्वावर टीकास्त्र सुरू असून निघोजमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांच्या बैठकीत सुजित झावरेंना डावलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या बैठकीत सुजित झावरेंना वगळून स्थापन करण्यात येणार्‍या कोअर कमिटीकडूनच यापुढील निवडणुका होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र उचाळे यांनी दुसर्‍याच दिवशीच झावरे यांची भेट घेवून निघोज बैठकीची माहिती दिली व पवार-झावरे वाद मिटल्याचे सांगितले. 

मात्र दीपक पवार व अशोक सावंत हे मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत जावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोअर कमिटी स्थापन करणार असल्याची माहिती समजली आहे. तर दुसरीकडे मधुकर उचाळे यांची शिष्टाई असफल झाल्याचे दिसून येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.