डाळिंबाला औषध फवारणीची शेतकऱ्याला झाली बाधा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नांदूर खंदरमाळ येथील शशिकांत शंकर रोकडे (वय ५०) हा शेतकरी डाळिंबाला औषधफवारणी करत असताना त्याला बाधा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतातील  पिकांना औषध फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी सांगितले. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नांदूर खंदरमाळ याठिकाणी शशिकांत रोकडे यांनी आपल्या वीस गुंठे शेतामध्ये डाळिंबबागेत औषधफवारणी करायची म्हणून गुरुवार दि. २१ सप्टेंबर रोजी घारगाव येथून एका कृषी सेवा केंद्रातून औषध आणले होते. शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रोकडे यांनी औषधफवारणी करायची म्हणून नाक, तोंडाला मास्क व डोळ्याला चष्मा लावला होता.

सगळी खबरदारी त्यांनी घेत त्यानंतर औषध फवारणी केली होती. तरीही रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांना श्वासोच्छ्वासास त्रास होऊ लागला. त्यानंतर घरच्यांनी त्यांना घारगाव याठिकाणी खासगी रुग्णालयात आणले होते. तेथून त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. 

डॉक्टरांनी ॲडमिट होण्यास सांगितले; पण दररोज होणारा हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसल्याने रोकडे यांनी दररोज येवून-जावून औषधोपचार घेतले आहे. जवळपास त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. याबाबत रोकडे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व संगमनेर पंचायत समिती यांनाही अर्ज दिले आहेत.

शशिकांत रोकडे या शेतकऱ्याने जे औषध डाळिंब पिकावर मारले आहे, ते त्यांच्याकडे शिल्लक नाही. त्यामुळे त्यांनी ज्या कृषी सेवा केंद्रातून औषध आणले आहे. त्या कृषी सेवा केंद्रात जाऊन आमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली; पण तेथेही ते औषध शिल्लक नाही. शेतकऱ्यांनी पिकांवर औषध फवारणी करताना अधीक काळजी घ्यावी. -कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.