वादळी पावसाने शेकडो एकर पिके पाण्याखाली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वादळ वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने वाकडी परिसरात शेतकऱ्यांची चांगलीच दैना झाली. काही ठिकाणी रानात सोंगणी करुन ठेवलेला सोयाबीन पावसाने भिजला तर काही ठिकाणी सोंगनीतील सोयाबीन, बाजरी मुसळधार पावसाने झोडपली. भर पावसात काही शेतकऱ्यांनी ओला भुईमग, सोयाबीन गोळा केला. नांदूरमध्ये वीज पडून दोन गायी दगावल्या.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वाकडी परिसरात शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले होते. अद्याप त्याचे पंचनामे झाले नाही, तोच पुन्हा वादळी पावसाने काल शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले. नांदूर गावात दादासाहेब लहानू बाबरे व बाळासाहेब आनंदराव जगताप या मजुरांच्या दोन गायी वीज पडून मृत झाल्या.

मागे झालेल्या पासाने ओढे, पुल, बांध वाहून गेले. त्यांची अद्याप दुरुस्ती झाली नाही. तोच पुन्हा सुरु झालेल्या वादळी पावसाने वाड्या वस्त्यांवरील नागरिक व शेतकरी तसेच आदिवासी भागातील लोक भयभीत झाले आहेत. काही ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. 

एकीकडे गावाच्या विकासाच्या मुद्यावर निवडून येणारे गाव पुढारी व नेते गावागावातील वाड्या वस्त्यांकडे अद्याप दुर्लक्ष करताना दिसत आहे. बहुतेक गावातील वाड्या वस्त्यांवरील रस्ते चिखलात व दलदलीत सापडले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.