सरकार भारनियमनाचे नियोजन करण्यात पूर्णत: अपयशी - आ.थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काँग्रेस सरकारच्या काळातही भारनियमन झाले; परंतु त्यावेळेस ग्रामीण भागात शेती डोळ्यासमोर ठेवून नियोजन झाले होते. आजचे सरकार मात्र भारनियमनाचे नियोजन करण्यात पूर्णत: अपयशी ठरलेले आहे. भारनियमनामुळे काँग्रेस आघाडी सरकारवर टीका करणारे आता मात्र गप्प का आहेत? असा सवाल करत ऐन सणासुदीच्या काळात संगमनेरकरांवर भारनियमनाचे संकट आले असल्याची टीका माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. थोरात म्हणाले की, दिवाळी जवळ आली आहे. सर्वत्र सणासुदीची धामधूम आहे. प्रकाशाचा हा सण सरकारने अंधारात साजरा करण्यास भाग पाडले आहे. शेती, व्यापार, औद्योगिकीकरण या सर्व क्षेत्राला भारनियमनाचा मोठा फटका बसला आहे.

हे राज्याच्या दृष्टीने हितावह नाही. ग्रामीण भागात अपुरी व कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतीचे ही मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. काही भागात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतावर पाणी भरणे किंवा बाहेर पडणे अवघड झाले आहे. सध्या राज्यात सर्वत्र सणासुदीचा काळ सुरु आहे. मात्र शहर व ग्रामीण भागात अपुरी विज व मोठे भारनियमन यामुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

भाजप व सेनेमधील मंत्री एकमेकांवर टिका करत आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही. मध्यमवर्गीयांना दिलासा नाही. पेट्रोल व डिझेलचे दर भरभसाट वाढविले आहे. महिलांसाठी कोणत्याही ठोस योजना नाही. विकासाचे कोणतेही काम नाही. 

फक्त जाहिरात बाजी असल्याने या सरकारवर आता जनतेचा विश्­वास राहिला नाही. काँग्रेस हा सर्वधर्म समभाव जोपासत सर्वांना विकास प्रक्रियेत सामावून घेवून वाटचाल करणारा पक्ष असल्याने आगामी काळात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, असा विश्­वासही त्यांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.