जिल्ह्यात विजांचे तांडव; वादळी पाऊस,तिघांचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात शनिवारी अतिवृष्टी झाली. विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. अकोले येथे वीज पडून देविदास जाधव तर कोपरगावाला लता संजय पवार आणि कर्जतला सचिन निंबोरे या तिघांचा मृत्यू झाला. विजा पडून कोपरगावात १४ महिलाही जखमी झाल्या. जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून, अनेक ठिकाणी जनावरे दगावल्याची घटना घडल्या. वादळाच्या तडाख्यामुळे झाडे उन्मळून पडली, तर पिकांचेही मोठे नुकसान झाले. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतामध्ये कांदा लागवडीचे काम करीत असताना अंगावर वीज पडून कडूबाई ऊर्फ लता संजय पवार (वय ३५, रा. खडकी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर विजेचा धक्का बसलेल्या जवळच काम करत असलेल्या १२ महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या एका घटनेत वारी शिवारात वीज पडल्याने दोन शेतकरी जखमी झाले आहेत तर आणखी एका घटनेत कोळगावथडी येथील एका घरातील साहित्य जळून खाक झाले.

शनिवारी काही महिला संवत्सर शिवारातील बिरोबा चौकानजीक कैलास कासार यांच्या शेतामध्ये कांदालागवडीसाठी गेल्या होत्या. दुपारी पावनेदोन वाजेच्या सुमारास किरकोळ पाऊस सुरू झाला. त्याचवेळी कडूबाई पवार यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्या जागीच ठार झाल्या. 

या विजेच्या झळा पवार यांच्या सोबत काम करत असलेल्या १२ महिलांना बसल्याने त्या जखमी झाल्या. यानंतर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला तर विजेच्या झळा बसलेल्या आशा एकनाथ अहिरे (वय ३५), लक्ष्मी गोरख अहिरे (वय ३६), सोन्याबाई संजय गायकवाड (वय ३५), मनिषा संजय गायकवाड (वय १९), मनिषा गोरख सोनवणे (वय ३०), सुनिता बाळू गायकवाड (वय २६), सुनिता बबन गायकवाड (वय ३०), लता रामदास गायकवाड (वय ४५), रेखा रविंद्र गायकवाड (वय २५), सुनिता सावळेराम गायकवाड (वय ३०, सर्व रा. लक्ष्मीनगर, संवत्सर), लंकाबाई साहेबराव पवार (वय ४१) व उज्वला विलास पवार (वय ३०, दोघी रा. खडकी) यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

या महिलांना विजेचा धक्का बसल्यामुळे त्यांच्या हातापायांना मुंग्या आल्या, काहींना शरीरात चमका निघून रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुंदन गायकवाड, डॉ. गोवर्धन हुसळे, डॉ. क्षीरसागर यांनी उपचार केले.

दुसऱ्या घटनेत वारी शिवारात रंगनाथ सांगळे यांच्या शेतामध्ये कांद्याची लागवड सुरू होती. पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या मारुती जेऊघाले (वय ५५) व रावसाहेब धट (वय ४३) यांच्या अंगावर वीज पडून दोघे जखमी झाले. त्यांच्या शरीराचा ३० टक्के भाग भाजला आहे. त्यांना वारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. 

आणखी एका घटनेत कोळगावथडी येथे रंगनाथ परसराम देवकर यांच्या घरावर वीज पडली. यात पंखा, टीव्ही, विद्युत मोटार, विजेच्या तारा, बल्ब यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरात एकट्या असलेल्या अरुणा देवकर या बालंबाल बचावल्या. 

तसेच शेजारील सोपा शामराव आढाव यांच्या घराच्या लोखंडी प्रवेशद्वाराला वीज चाटून गेल्याने ठिणग्या पडल्या. घटनेची माहिती समजताच विलास आढाव, शांताराम उगले, बाबासाहेब लुटे, अंबादास कवडे, सागर आढाव, विठ्ठल लुटे यांनी मदतकार्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.