माजी आमदार राजीव राजळे यांचे मुंबई येथे दुःखद निधन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी आमदार राजीव राजळे यांचे मुंबई येथे ग्लोबल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतांना रात्री बारा च्या दरम्यान हृदविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. गेल्या दिड महिन्यांपासून राजळे हे दवाखान्यात उपचार घेत होते.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडीयावर येताच नगर जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.आज दुपारी ४:३० वाजता कासार पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 5 डिसेंबर 1969 रोजी कासार पिंपळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. निधनसमयी ते 48 वर्षाचे होते.

अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा राज्याला परिचय होता. १९९९ साली युवक कॉंग्रेस मध्ये प्रचारक म्हणून त्यांनी राजकीय जीवनाची सुरवात केली होती,2004 मध्ये ते शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार झाले होते.त्यांनी विधानसभेत अर्थसंकल्पवर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची मोठी चर्चा झाली होती.

२०१४ त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता सहकारातील नेते अप्पासाहेब राजळे यांचे ते चिरंजीव तर शेवगाव - पाथर्डी मतदार संघातील विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे ते पती होत.त्यांच्या पश्चात वडील माजी आमदार अप्पासाहेब राजळे, पत्नी आमदार मोनिका राजळे,२ मुले व भाऊ असा परिवार आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.