दलित महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागासवर्गीय समाजातील चांदणे कुटुंबाच्या जागेची नोंद करुन, बांधकाम परवानगी मिळण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले. या उपोषणात प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष नामदेव चांदणे, कडूबाबा लोंढे, संजय चांदणे, निलेश चांदणे, भानुदास साळवे, राम पाटोळे, शोभा चांदणे, शिवाजी बुलाखे, राजाराम काळे, किशोर वाघमारे, अंकुश राक्षे, बडू पाडळे, चंद्रकांत सकट आदि उपस्थित होते.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दत्तात्रय चांदणे अनेक वर्षापासून नगर तालुक्यातील देहरे येथे शासनाच्या जागेवर छप्पर टाकून राहत आहे. देहरे ग्रामपंचायतीने त्यांच्या ताब्यातील सर्व्हे नं. 216 जमीनीचा ल-74 राजनामा तहसिलदार यांना सादर करण्यात आला. त्यानुसार 60 गुंठे जागा चांदणे कुटुंबाला देण्यात आली. त्यावेळी चांदणे कुटुंबाने त्याठिकाणी छपराच्या समोरील जागेत पक्के घर बांधत असताना येथील गावगुंडांनी घर बांधण्यास अडथळा निर्माण केला. 

जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. चांदणे कुटुंबीयांचा विचार करुन, जागेची नोंद लावून बांधकाम करण्यास परवानगी देण्याची तर बांधकामात अडथळा निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभय महाजन यांना देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.