बाह्यवळण रस्ता दुरुस्तीसाठी निंबळक गटातील ग्रामस्थ आक्रमक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बाह्यवळण रस्ता राज्य महामार्गाची (रस्ता क्र.222) मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्‍वासन मिळून देखील अद्यापि सदर रस्त्याचे काम सुरु झाले नाही. शासनाने जीएसटी 18 टक्के लावल्याने राज्यातील ठेकेदारांनी सदर रस्त्याच्या कामासाठी पाठ फिरवली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तीसर्‍यांदा ई निवदा काढण्यात आली असून, शासन व प्रशासनाच्या गोंधळात सर्वसामान्य ग्रामस्थ भरडले जात आहे. रस्त्या लगत असलेल्या शेतीच्या पीकांचे धुळीने नुकसान झाले असताना, प्रशासनात्मक कार्यवाही पुर्ण करुन, या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी निंबळक गटातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. येत्या गुरुवार पर्यंन्त सदर रस्त्याचे काम सुरु न झाल्यास शुक्रवार दि.13 ऑक्टोबर रोजी सदर रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून, रहदारी बंद करत रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

या मागणीचे निवेदन गृह शाखेच्या नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. यावेळी निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, अजय लामखडे, ग्रा.पं. सदस्य अशोक शिंदे, विलास होळकर, सुभाष कोरडे, मारुती गारुडकर, जगन्नाथ शिंदे, मुख्तार खान, हसन जहागीरदार, तौफिक पटेल, दत्ता भूमकर आदि उपस्थित होते.

निंबळक गटातील ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने, रास्ता रोको व सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या देवून बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. आंदोलकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. मात्र अद्यापि सदर रस्त्याचे काम सुरु न झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पावसाळ्यात रस्त्याची मोठी दुरावस्था होवून, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर घडत असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने 5 ते 7 कि.मी. अंतर जाण्यासाठी वाहनधारकांचा दीड ते दोन तासांचा वेळ जात आहे. 

संपुर्ण रस्ता धुळीने माखला असताना रस्त्यालगत असलेल्या शेतीच्या पीकांचे धुळीने नुकसान झाले आहे. तसेच या रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमीनीचा थकित वाढीव मोबदला न्यायालयाचे आदेश असून सुध्दा मिळाला नसल्याने रस्ता चौपदरी करण्यास शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला आहे. दीड वर्षापासून निंबळक गटातील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीसाठी संघर्ष करीत असून, प्रशासन मात्र वेळकाढूपणा करीत असल्याचा निषेध ग्रामस्थांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.