धरण उशाला अन् कोरड घशाला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धरण उशाला आणी कोरड घशाला अशी अवस्था आज नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांची झाली आहे.गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव भरलेला असूनही तब्बल आठ दिवसानंतर पिण्याचे पाणी सुटते.यापेक्षा मोठे दुर्दैव्य कोणते.असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याअध्यक्ष अशोक कोकाटे यांनी उपस्थित केला. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेतते बोलत होते.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या कामाचे चांगलेच वाभाडे काढले. गावात जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कोणत्याच कामाची कागदपत्रे ग्रामंपचायतीकडे उपलब्ध नाहीत. तसेच ग्रामसभेत झालेले ठराव संबंधित वरिष्ठ कार्यालयास वेळेत पाठवले जात नसल्याचेही त्यांनी निर्दशनास आनले. 

तरी ती कागदपत्रे व सर्व कामाची माहिती संबंधीत विभागाकडुन मागण्यात यावी, असा ठराव कोकाटे यांनी मांडला व या पुढे ग्रामपंचायतने सर्व ठरावाचे शासन दरबारी पाठवावे व पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

महात्मा गांधी जयंती निमित्त नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे दि.२ ऑक्टोंबरला झालेल्या ग्रामसभेत मागील ग्रामसभेत घेतलेले ठराव संबंधित कार्यालयाकडे ग्रामविकास अधिकाऱ्याने पाठवले नाही. ही बाब उपसरपंच शरद पवार यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याअध्यक्ष अशोक कोकाटे ग्रामसभेत बोलताना म्हणाले की, यांनी चिचोंडी पाटील गावात आज घडीला नदीला पाणी वाहते आहे. तसेच तलावातही भरपूर पाणी आहे. मात्र एवढे असूनही गावाला आजही तब्बल आठ दिवसानंतर पिण्याचे पाणी सुटते.

गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर योजनेतून सबस्टेशन ते केळ तलाव अशी स्वतंत्र विजेची लाईन (एक्सप्रेस फिडर) टाकावी. जेणेकरुन केळ तलाव व संपवेल या ठिकाणी २४ तास वीज उपल्बध होईल.जेणेकरून गावाला कमीत कमी दिवसाआड पाणी पुरवठा होईल. असा ठराव मांडला.

मात्र असाच ठराव यापूर्वीदेखील मांडण्यात आला होता. परंतु शासकीय कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाही.ठराव व असे अनेक लोकहिताचे ग्रामस्थांनी मांडलेल्या ठरावांचा ग्रामपंचायत शासन दरबारी पाठपुरावाच केला नसल्याचे लक्षात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.