पारनेरच्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील शेतकरी सोपान बबन नागवडे (वय ४५) यांनी (दि ५ रोजी) सायंकाळी ५ वाजता राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला साडीच्या वळलेल्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यासाठी त्यांनी लोकांकडून उसनवार पैसे घेतले होते. मात्र नुकत्याच झालेल्या जास्त पावसामुळे शेतातील पिके वाया गेल्याने आर्थिक उत्पन्न न मिळाल्याने व आपण लोकांचे पैसे परत करू शकत नाही. या चिंतेने हताश होऊन त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आपले जीवन संपवले.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक विवाहीत मुलगी असा परिवार आहे.अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या या शेतकऱ्याने प्रापंचिक अडचणीमुळे आपले जीवन संपवल्याने व या कुटुंबाचा कर्ता पुरूषच गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात (दि.६ रोजी) त्यांच्यावर वाळवणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोरख त्रिंबक थोरात यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी.बी. अकोलकर करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.