सहा महिन्यातच खचला तिसगाव मिरी रस्ता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ते मिरी हा सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून, झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अवघ्या सहा महिन्यापूर्वी तिसगाव ते पारेवाडीपर्यंत सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र काम सुरू असतांना त्यावेळेस झालेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली.

त्यामुळे दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा काही दिवसातच ठिकठिकाणी खचला आहे.असा आरोप पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांनी केला आहे. रस्त्याचे डांबरीकरण अथवा साईडपट्या किंवा इतर दुरूस्ती सुरू असतांना संबंधित अधिकारी अनेकवेळा कामाकडे फिरकत नाहीत. 

अशावेळी ठेकेदार कामे उरकूण घेण्याची घाई करतात . शिंगवे फाटा येथे नव्याने बांधलेला पूल आणि त्यावर केलेले डांबरीकरणही उखडलेले आहे. अशा निकृष्ठ कामाला जबाबदार कोणाला धरायच. 

अशाच पद्धतीनेच काम होत गेली तर शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेल्याशिवाय राहणार नाही. अनेकवेळा संबंधित अधिकारी कामाबाबत नीट माहिती सुद्धा देत नाहीत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.