शौचालय नसल्याने सरपंचासह सहा सदस्यांवर कारवाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मालेवाडी येथील सरपंचासह सहा सदस्य शौचालयाचा वापर करीत नसल्याचे आढळुन आले आहे. सरपंचासह त्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना पाठविला आहे. सदस्यच शौचालयाचा वापर करीत नसून गाव हागणदारीमुक्त करण्यात त्यांचाच अडसर असल्याचे समितीच्या गुडमाँर्निंग पथकाने स्पष्ट केले आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

मालेवाडी गावात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी स्वत: ग्रामसभा घेतली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडेच शौचालये नाहीत, आम्हाला काय शौचालये बांधयला सांगता, असा प्रतिप्रश्न ग्रामस्थांनी पालवे यांना केला.

पालवे यांनी सरपंच व सदस्यांना शौचालयाच्या वापराचा आग्रह धरला. त्यानंतर गुडमाँर्निंग पथक मालेवाडीत गेले. त्यावेळी सरपंच चंद्रकला पांडुरंग खेडकर, सदस्य देवीदास मच्छद्रिं दराडे, दिनकर आश्रु किर्तने, वसंत कोंडीबा खेडकर , ज्ञानदेव बापु खेडकर,संगीता अशोक जवरे हे सहाजण शौचालय वापरीत नसल्याचे उघड झाले. अनेक सदस्यांचे शौचालये पडलेली, भांडे बसविलेली नसणे, शौचालयात झाडे उगवणे असे प्रकार उघडकीस आले. 

पथकाने पंचनामे करुन गटविकास अधिकारी पालवे यांच्याकडे अहवाल सादर केला. पालवे यांनी या जणांविरुदध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज) अन्वये कारवाई करुन संबधितांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. 

चिचंपूर इजदे येथील महिला सदस्या मिना योहान खंडागळे यांचेही सदस्यत्व रद्दचा प्रस्ताव पाठविला आहे. पाथर्डी तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहेत. नागरीक त्यांना उलटसुलट बोलून कामात अडचणी आणीत असल्याचे वाईट चित्र समोर आले आहे. .

मालेवाडी येथील सरपंच व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार अशी चर्चा सुरु झाल्याने अनेक गावातील सदस्यांनी शौचालयाचे बांधकामे सुरु केली आहेत. मालेवाडीतील एका सदस्य असणाऱ्या महिलेच्या शौचालयात शौचालयाचे भांडेच नव्हते. त्यामधे सीताफळीचे झाड उगवले ते सहा ते सात फूट उंच वाढले. त्याला फळेही लागली आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.