भरधाव ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थी जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-कल्याण रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत घरी परतणाऱ्या राजेंद्र वांढेकर (वय १३, रा.शिवाजीनगर, कल्याण रोड) या शालेय विद्याथ्र्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.६) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबतची माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात मालट्रक चे (एमएच ०४, सीजी ५९७०) वेगावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने नेप्ती नाक्याकडून घराकडे सायकलवरुन जाणाऱ्या १३ वर्षीय आदित्य राजू वांढेकर (रा. शिवाजीनगर, भावनाऋषी सोसायटी, कल्याण रोड) या शाळकरी मुलाला धडक दिली.

ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये आदित्यचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक ट्रक घटनास्थळावर सोडून पसार झाला. आदित्य यास दवाखान्यात वाहन उपलब्ध नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राम नळकांडे यांनी ॲम्ब्युलन्स सेवेसाठी १०८ क्रमांकावर फोन केला परंतु फोनवरुन काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही. 

या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना कळविली. मात्र घटनास्थळी ॲम्ब्युलन्स व पोलिस लवकर आले नाहीत. जवळपास अर्धा तास आदित्यचा देह रस्त्यातच पडून होता, अशी माहिती राम नळकांडे यांनी दिली. वाहनाची व्यवस्था करून आदित्यचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. 

त्याला तिथे मृत घोषित करण्यात आले. आदित्य हा समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सांगळे गल्ली या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. तो सामाजिक कार्यकर्ते राम नळकांडे यांचा भाचा होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.