अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळप्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.बी. भिल्लहारे यांनी आरोपी सतीश म्हातारबा पवार (रा.कातळवेढे, ता.पारनेर) याला दोषी धरुन एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील कातळवेढे येथील सतीश म्हातारबा पवार याने दि.७/५/२०१४ रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास जि.प. शाळेच्या खोलीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

याबाबत सतीश पवार याचेविरुद्ध भादवि कलम ३५४ अ बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम १२ व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (११) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नं. ८ ए.बी.भिल्हारे यांचेसमोर झाली. 

न्यायालयाने आरोपी सतीश म्हातारबा पवार याला दोषी धरुन एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. रामदास गवळी यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.