मोटारसायकल न दिल्याने महाविद्यालयीन विद्याथ्र्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाविद्यालयाला जाण्यासाठी वडिलांकडे मागणी करूनही मोटारसायकल न दिल्याचा राग मनात धरून आकाश संजय राऊत (वय १९, रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) या इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वडाळामहादेव ते हरेगाव रस्त्यावर गुरूवारी (दि. ५) सकाळी ७.३० वाजेपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी : आकाशचे वडिल संजय नारायण राऊत हे कुटुंबासह नोकरीनिमित्त भेंडा फॅक्टरी येथे राहतात. आकाश याठिकाणीच शिक्षण घेतो. सुटी असल्याने तो व त्याचा भाऊ दोघे वडाळामहादेव येथे आजोबांकडे आले होते.

एक दिवस शेतीत काम केल्यानंतर आकाशचा भाऊ सकाळी भेंडा फॅक्टरी येथे निघून गेला. त्यानंतर आकाश हा शेतात ओजाबांना भेटून त्यांच्याकडून गाडी घेऊन परीक्षेला जाणार असल्याचे सांगून बुधवारी (दि. ४) घरातून बाहेर पडला. त्यानंतर आजोबांना भेटल्यानंतर त्यांच्याकडे गाडी मागितली, मात्र आकाशच्या वडिलांनी त्याला गाडी देवू नका व एस.टी.ने येण्यास सांगितले. 

याचा राग मनात धरून आकाश परीक्षेला जातो म्हणून आजोबांकडून निघून गेला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरीही आला नाही व परीक्षेलाही नसल्याचे समजल्याने कुटुंबियांना परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. 

दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ५) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वडाळा महादेव ते हरेगाव रस्त्यावर ग.क्र. २२४ मधील शंकर पवार यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला आकाशचे शालेय साहित्य आढळून आले. विहिरीत डोकावले असता, त्याचा मृतदेह आढळून आला. 

याबाबत शहर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार मारूती कोळपे, हवालदार प्रदिप बढे, किशोर जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. 

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूरला पाठविला. याप्रकरणी गणेश अशोकराव राऊत यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अ.मृ.र.नं. ८७ / १७ नुसार १७४ अन्वये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. अधिक तपास मुख्य हवालदार मारुती कोळपे हे करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या तब्यात देण्यात आला. आकाश याच्यावर वडाळामहादेव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.