प्रचार तोफा थंडावल्या आता लक्ष निवडणुकीकडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनतेतून सरपंच निवडण्याचा शासनाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, बनपिंप्री, चवरसांगवी, बेलवंडी, पारगाव, माठ, घोगरगाव, थिटेसांगवी, तांदळी दुमाला, तरडगव्हाण अशा दहा गावांच्या ग्रामपंचायत निवडणूक होत आहेत. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या दहा ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदाच्या एकूण ११० जागा होत्या. त्यापैकी २०जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, बनपिंप्री गावात एका जागेसाठी अर्जच न आल्यामुळे ती जागा रिक्त राहिल्याने, आता ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण ८९ जागांसाठी १८४, तर सरपंचपदाच्या दहा जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

तालुक्यातील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची काष्टी, जि.पचे माजी उपाध्यक्ष अणासाहेब शेलार यांचे बेलवंडी, माजी जि.प अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची घोगरगाव, तर विधान परिषद सदस्य अरुणकाका जगताप यांच्या बनपिंप्री गावच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या गावात तळ ठोकून होम टू होम प्रचार करत परिसर पिंजून काढला आहे.

काष्टी गावात माजी मंत्री पाचपुते यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत काढून घेण्यासाठी गावातील दिग्गज राजकीय विरोधकांनी एकी करत पाचपुतेंना खिंडीत गाठण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. तर बेलवंडी गावातही अणासाहेब शेलार यांच्या नेतृत्वातील ग्रामपंचायतीमध्ये विजय संपादन करण्यासाठी विरोधकांनी जोरदार रननिती आखली आहे.बाबासाहेब भोस यांच्या घोगरगाव ग्रामपंचायतीमध्ये भोस गट व जगताप गटाच्या उमेदवारामध्ये सरळ लढत होणार आहे. 

तर पारगाव ग्रामपंचायतीमध्ये अशीच काहीशी स्थिती आहे. आ.अरुणकाका जगताप यांच्या बनपिंप्री गावात सदस्य पदाच्या ९ जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून, एका जागेसाठी उमेदवारी अर्जच न आल्यामुळे ती एक जागा रक्तच राहणार आहे. या गावात सदस्यपदाच्या जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी सरपंच पदासाठी मात्र याठिकाणी दुरंगी लढत होणार आहे.

एकूणच आता सरपंच निवडण्याचा अधिकार थेट जनतेला असल्यामुळे ही निवडणूक नेत्यांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. दरम्यान आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, आता उद्याचा दिवस नेते, कार्यकर्ते अप्रत्यक्ष प्रचारावर, छुप्या प्रचारावर जोर देत वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करणार असून, यामध्ये मतदारांची मात्र दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आता ७ ऑक्टोंबरला मतदान झाल्यावर मतदार मतदारराजा कुणावर विश्वास टाकतो, हे ९ ऑक्टोंबरला मतमोजनी झाल्यानंतरच समजेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.