भाजप-सेनेच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सोशल मिडियाचा वापर करीत सत्तेवर आलेल्या सत्ताधारी भाजपा सरकारला अच्छे दिनाचा विसर पडला असून एकीकडे महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढत असताना केवळ खोटी आश्वासने देऊन मोदी सरकारने सर्व सामान्यांची फसवणूक केली असा घणाघाती आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा भाजपा-सेनेच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जड इशाराही यावेळी वळसे यांनी दिला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी (दि. ५) नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला होता. यावेळी वळसे पाटील बोलत होते. या मोर्चात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आ. अरुणकाका जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आमदार नरेंद्र घुले, महिला अध्यक्षा मंजुषा गुंड, जि.प. उपाध्यक्षा राजश्री घुले, पांडुरंग अभंग, जि. प. माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, बाबासाहेब भिटे, सुजीत झावरे, सुप्रिया झावरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सबाजी गायकवाड, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, अरविंद शिंदे, किसनराव लोटके, सोमनाथ धुत, कुमार वाकळे, संपत बारस्कर, संपतराव नेमाणे, शारदा लगड, रेश्मा आठरे, अशोकराव बाबर, शिवाजी गाडे, वसंत शिंदे, अभिजीत खोसे, चेतन शेलार यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरच्या जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. मार्केटयार्ड चौक, जुनी वसंत टॉकीज, बंगालचौकी, धरती चौक, हातमपुरा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी अभय महाराजन यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी तुमच्या भावना शासनाला कळवू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत वळसे पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षात भाजपा सरकारने राज्यात वीज मंडळाची वाट लावली आहे. योग्य व्यवस्थापन नसल्याने सरकारकडे कोळसा घेण्यासाठी पैसा नाही तसेच वीज खरेदीसाठी सरकारकडे पैसा नसल्याचे सांगितले जात आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढील सहा महिन्यात सरकारकडे वीज मंडळाच्या कामागारांचे पगार देण्यासाठी पैसा राहणार नाही.

यावेळी बोलताना अंकुश काकडे म्हणाले सध्या देशात अराजकता निर्माण झाली आहे. महागाई वाढली असून तेल, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव भडकले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात भाववाढ झाली असून मोहरम, दिवाळीच्या काळात भारनियमन सुरू झाले आहे. या सरकारला जनतेचे काही देणे-घेणे राहिले नसून अदानी, अंबानी या उद्योगपतींची लाईट घ्यायची आहे हा उद्देश आता काही लपून राहिला नाही. 

सर्वसामान्य जनता नोटाबंदी, जीएसटी, महामागाई यामुळे मेटाकुटीला आली आहे. तेव्हा आता सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अन्यथा राष्ट्रवादीतर्फे जिल्ह्यासह तालुका पातळीवर आंदोलने उभारली जातील असा इशारा दिला. यावेळी महिला अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, पांडुरंग अभंग, प्रा. अरविंद शिंदे यांची भाषणे झाली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.