पर्यटनस्थळ म्हणून मुळा धरणाचा विकास दिवा स्वप्नच?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुळा धरण व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या अनेकदा घोषणा झाल्या. अनेकदा राजकिय गरज म्हणूनही या घोषणा होत राहिल्या. मात्र प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. याबाबतीत राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा कायमच अभाव दिसुन आला. याशिवाय शासकीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळेही मुळा धरणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्याच्या घोषणा या स्वप्नच राहणार की काय? असा सवाल आता पर्यटनप्रेमी करु लागले आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या मुळा धरणाचा विस्तीर्ण परिसर हा खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्र म्हणून यापुर्वीच विकसित व्हायला पाहिजे होता. धरण परिसर पाहण्यासाठी वर्षभर जिल्हा व जिल्ह्याबाहेरूनही मोठ्या संख्येने पर्यटक कुटूंबासह येत असतात. आता तर मुळा धरण भरल्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच आहे.

धरणाच्या भिंतीचा परिसर, चुमेरी विश्रामगृह व बाजूचा परिसर, ज्ञानेश्वर उद्यान आदी ठिकाणे ही पर्यटन पुरक आहेत. असे असताना या ठिकाणी पर्यटकांना आकर्षण असणारे व सुरक्षेच्या दृष्टिने महत्वाचे ठरणारे संरक्षक कठडे, निवांत बसण्याची आकर्षक बाके यासह अनेक सोयीसुविधांचा वानवा आहे.मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे, ही शोकांतिका आहे.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. येथून विमान सेवा सुरु झाली आहे. शिर्डी येथील विमान सेवा सुरु होण्यापूर्वी मुळाधरणावर सी प्लेनच्या रूपाने ११ मार्च २०१४ ला विमान सेवेचा पाया रचला गेला होता. सी-प्लेन सेवेचा शुभारंभ देखील झाला होता. मात्र या सेवेला अपयश आले. शिर्डी,मेहेराबाद,शनिशिंगणापूर आदी धार्मिकस्थळांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरु शकणारी ही सेवा बंद झाली.

राज्य शासनाच्या बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या पध्दतीने मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर पुण्याच्या कंपनीने ४ मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले.त्यांची वीजनिर्मितीची चाचणीही यशस्वी होऊ शकली नाही.

त्यातच आता या प्रकल्पामुळे धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आरोप होत असल्याने पाण्यावरील वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम अधांतरी आहे. मुळा धरणाला 'ज्ञानेश्वर सागर' हे नाव देण्यात आल्यानंतर मुळा धरण येथे सुंदर असे ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर उभारण्याचे नियोजन होते. तेही पूर्ण होऊ शकलेले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.